सध्या देशात पाच राज्यातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये सगळेच पक्ष निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु करत आहेत. गोव्यात सुरुवातीपासूनच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येथे उत्पल पर्रीकरांची उमेदवारी भाजपकडून कापण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता रंगत वाढू लागली आहे. असे असताना आता शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपचे टेन्शन आता वाढले आहे. आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे.
यामुळे भाजपला येथे पराभूत करण्यासाठी सगळेजण एकवटले असल्याचे दिसून येत आहे. आज पर्रिकरांसाठी आमचा उमदेवार त्याचा अर्ज मागे घेईल. तसेच शिवसेना उत्पल पर्रिकरांचा प्रचार करेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेने पर्रिकर यांना पाठिंबा दिल्याने पणजीची लढत आता जोरदार होण्याची शक्यता आहे. यामुळे या जागेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता कोण जिंकणार हे लवकरच समजणार आहे. आमचे कार्यकर्ते मुंबईतून येतील ते पर्रिकर यांचा प्रचार करतील, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी आधी बोलल्याप्रमाणे शिवसेना पणजीतील उमेदवारी मागे घेत उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच अमित शहा गोव्यात येऊन जोरदार प्रचार करत आहेत. भाजपने मोठी यंत्रणा येथे राबवली आहे. महाराष्ट्रातून देखील अनेक नेते आमदार येथे प्रचार करत आहेत. यामुळे नेमके काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह यांनी गोव्यात दाखल होताच सर्व राजकीय पक्षांवर तोफा डागल्या होत्या. आम आदमी पक्षाने देखील येथे ताकद लावली आहे.
काही दिवसांपासून संजय राऊत सतत उत्पल पर्रीकरांच्या तिकीटावरून भाजपवर टीका करत होते. तसेच उत्पल पर्रीकरांनी ठाम राहवे त्यांनी निर्णय बदलू नये, असे सल्लेही राऊत देताना दिसून आले. उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देऊ असे संजय राऊतांनी जाहीर केले होते. यामुळे आता याचा त्यांना फायदा होणार आहे. तसेच उत्पल पर्रीकरांना आपकडून देखील निवडणुकीची ऑफर होती, मात्र त्यांनी नकार दिला होता.
Share your comments