गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहकार टिकवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. अनेक सहकारी कारखाने बंद पडले आहेत. असे असताना काही कारखाने मात्र देश पातळीवर नाव कमवत आहेत. यामुळे सहकार टिकवण्यास एकप्रकारे बळ मिळत आहे.
आता दत्तात्रयनगर आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांचा सन २०२१-२२ करीता देशातील उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामुळे कारखान्याच्या व्यवस्थापनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे.
द्राक्ष आणि डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन, शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन..
या कारखान्यास याआधी देखील देश पातळीवरील ११ व राज्य पातळीवरील १२ असे एकूण २३ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी याबाबत माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या;
Farmar loan: कर्ज फेडणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांना दिलासा
मोबाईलने जमीन किंवा शेत कसे मोजायचे? वाचा साधी आणि सोप्पी पद्धत..
वेदांता प्रकल्पासाठी तळेगावात 6 हजार एकर जमीन संपादित, सातबारावर एमआयडीसीचा शिक्का, शेतकऱ्यांना मोबदला, वाचा खरी कहाणी
Share your comments