MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

पाऊसकाळ चांगला; पण नैसर्गिक रोगराईच्या संकटासह भासणार चारा टंचाई

साडेतीनशे वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यात असलेल्या भेंडवळ येथील वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी या भविष्यवाणीला सुरुवात केली. कृषीविषयक पिकं, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, व्यापार आणि आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत वर्षभराचे भाकित यामध्ये नोंदवले जाते.

KJ Staff
KJ Staff


साडेतीनशे वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यात असलेल्या भेंडवळ येथील वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी या भविष्यवाणीला सुरुवात केली.  कृषीविषयक पिकं, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, व्यापार आणि आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत वर्षभराचे भाकित यामध्ये नोंदवले जाते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बुलडाण्याच्या या प्रसिद्ध भेंडवळमधील घट मांडणी होणार नाही, असे जाहिर करण्यात आले होते. यंदा पाऊस पाणी चांगला राहील असं वर्तवण्यासह या भविष्यवाणीत गुरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे वर्ष थोडं त्रासदायक असणार आहे. चार महिन्यात पाऊस चांगला होईल, अतिवृष्टी होणार आहे यासह चारा टंचाई भासणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.   

मात्र ही 350 वर्षाची परंपरा खंडित होऊ,  नये यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सारंगधर महाराज यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजासह चार लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली.  भेंडवळची पीक-पाण्याबाबतची भविष्यवाणी केवळ चौघांच्या उपस्थितीत करण्यात आली.  भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा पाऊस भरपूर होईल पण पीक परिस्थिती साधारण राहील, देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल.  देशाचा राजा कायम राहील, मात्र त्याच्यावर ताण वाढेल,  संरक्षण व्यवस्था मजबूत जरी असली तरी शत्रूच्या कारवाया सुरुच राहतील, त्यामुळे सर्वांना सोबत राहून संकटाशी सामना करावा लागेल, असे भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवले आहे.

काय आहे भेंडवळची भविष्यवाणी 

अक्षय मुहूर्ताच्या संध्याकाळी बुलढाण्यातील भेंडवळ येथे गावकरी शेतामध्ये 18 विविध धान्यांची पेरणी करतात. या प्रतिकात्मक मांडणीमधून समोर आलेल्या निकालामधून पाऊसपाणी, शेती पासून देशाच्या राजकीय स्थितीबद्दल अंदाज व्यक्त केला जातो.
भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावजवळच्या पूर्वेकडील वाघ शेतात मांडण्यात येणाऱ्या घटाची मांडणी व दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करुन भाकित वर्तवण्यात येते.

असे आहे भेडवळची भविष्यवाणी

  • यावर्षी चारही महिन्यात पावसाळ सर्वसाधारण व चांगल्या स्वरुपात राहील. अतिवृष्टि होईल, त्यामुळे नासाडी सुद्धा होईल.
  • पृथ्वीवर नैसर्गिक व रोगराईचे संकट येईल. त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.
  • राजा कायम राहील मात्र आर्थिक स्थिती खालावल्यामुळे राजा वर तणाव वाढेल.
  • परकीयांची घुसखोरी होईल संरक्षण खात्यावर ताण राहील, त्यामुळे त्रास होईल.
  • ज्वारी, तूर, गहू, कापूस, सोयाबीन सर्व पिकं चांगली येतील. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल. चारा टंचाई भासेल.
  • जामिनीतील पाण्याची पातळी वाढेल. पाऊस चांगला असल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल.

English Summary: bhendwal prediction this year rain will good , but Fodder scarcity will be accompanied by natural disease crisis Published on: 27 April 2020, 05:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters