केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता बरेच महिने झाले आहेत.केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या परंतु यामधून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरून प्रखर विरोध केला तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा सरकारवर परिणाम झालेला दिसला नाही.
आता पुन्हा शेतकऱ्यांनी सरकारला देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत बंद यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या 17 तारखेला उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील किस शेतकरी संघटना, ट्रेड युनियन,युवक संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन,व्यापारी संघटना यांच्यासोबत बैठक करणार आहेत.
कारण की हा बंद यशस्वी होण्यासाठी आणि सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे नमते घ्यावे लागावे यासाठी 17 तारखेला ही बैठक आहे. आंदोलनाच्या मागील अनुभव पाहिले तर आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांची घोषणाबाजी होते. कधीकधी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. तरीसुद्धा सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. परंतु यावेळेस शेतकरी कोणत्या पद्धतीने या बंदचे नियोजन करतात आणि कोणत्या प्रकारे सरकारवर दबावआणतील हे येणारा काळच ठरवेल.
आता सगळे शेतकरी 27 सप्टेंबरच्या तयारीला लागलेआहेत.शहरी भागामध्ये हा बंद यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारचे व्यापारी संघटना तसेच कर्मचारी संघटना व ट्रेड युनियन सोबत शेतकरी संपर्कात आहे. व्यवस्थित नियोजन करून हा बंद पूर्ण देशात यशस्वी केला जातो अशा प्रकारचे शेतकरी संघटनेकडून आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनाची सुरुवात मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाली होती. त्यानंतर चर्चेच्या बऱ्याच फैरीहोऊन देखील तोडगा निघाला नाही.
Share your comments