मागील वर्षांपासून शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे जसे की मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व सतत बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाच्या बागेवर किडीचा प्रादुर्भाव पडत आहे. किडीचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी ज्या कीटकनाशकाची फवारणी केली तर त्या कीटकनाशकाची कंपनी च अस्तित्वात नाही म्हणजे फेक कीटकनाशक आहेत हा सर्व प्रकार कृषी विभागाने समोर आणला. या बनावटीच्या किटकानाशकामुळे जवळपास २५ लाख पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशके घेताना काळजी घेणे महत्वाचे आहे नाहीतर पिकाचे तर नुकसान आहेच त्याचबरोबर आर्थिक समस्याला सुद्धा सामोरे जावे लागते.
नेमके काय झाले नगर जिल्ह्यातील गावडेवाडीत...
नगर जिल्ह्यातील गावडेवाडी गावातील प्रकाश व विनोद गावडे हे दोघे डाळिंबाचे उत्पादन घेतात. ज्यावेळी डाळिंब काढणीला आले त्यावेळी त्यावर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये व चकाकी यावी म्हणून बायोसोल या नावाचे कीटकनाशक फवारले. त्यांनी फवारणी केले मात्र काही दिवसानंतर फळगळ होण्यास सुरू झाले त्यामध्ये त्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर त्यांनी कृषी विभागाच्या नोंदणी केली. कृषी विभागाने चौकशी चालू करताच मिरजगाव मधील बनावट औषधे विकणाऱ्यावर त्यांनी छापा मारला तर त्यामध्ये असे समोर आले की त्या कीटकनाशकाची कंपनीच अस्तित्वात नाही.
असे ओळखा बनावट किटकनाशक...
शेतकरी ज्यावेळी कीटकनाशक खरेदी करायला जातात त्यावेळी ते औषध बनावट आहे का नाही ते कसे ओळखायचे. जसे की ते कीटकनाशक घेताना त्याची किंमत काय आहे त्या किमतीला न विकता तो कमी किमतीत देत असेल तर ते खरेदी करू नये असा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिलेला आहे. तसेच ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे नावानेच काही बोगस औषधे बनवले जातात तर त्यावेळी किमंत तसेच अंतिम मुदत किती आहे याची चौकशी करा.
गुणनियंत्रकाच्या मार्फत तपासणीच होत नाही...
कीटकनाशकाची तपासणी करूनच ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी असा नियम कृषी विभागाचा आहे मात्र त्याची तपासणी न करताच बाजारपेठेत विकायला ठेवली जात आहेत आणि याचमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच खरेदी केल्यानंतर त्याची पावती सुद्धा दिली जात नाही.
Share your comments