प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एका वर्षात तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. पी एम किसान योजनेचे लाभधारक शेतकऱ्यांना या योजने सोबतच पीएम किसान मानधन योजना च्या स्वरूपात मासिक पेन्शन ची सुविधादेखील उपलब्ध आहे.
पी एम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या खातेदार शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. तुमची नोंदणी थेट पीएम किसान मानधन योजना मध्ये केली जाते. या लेखात आपण पीएम किसान मानधन योजना नेमकी काय आहे याबद्दल माहिती घेऊ.
पीएम किसान मानधन योजना
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन ची तरतूद आहे.कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षाचे कोणतेही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ होईल.
या योजनेचे स्वरूप
रजिस्टर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रति महिना गुंतवणुकीच्या आधारावर वयाच्या 60 वर्षांनंतर किमान तीन हजार रुपये किंवा वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.यासाठी प्रतिमहिना गुंतवणूक पंचावन्न रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. तसेच या मानधन योजनेत कौटुंबिक पेन्शनची देखील तरतूद आहे. पी एम किसान योजनेचे खातेदार जर पीएम किसान मानधन योजना सहभागी झाले त्यांची नोंदणी सहज होते. विशेष म्हणजे पेन्शन योजनेमध्ये भरावे लागणारे पैसे हे तुमच्या खिशातून गुंतवावे लागत नाही तर ते एम किसान सन्मान निधी च्या योजनेतून कपात होतात.
या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 55 आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये गुंतवावे लागतात. एका वर्षाचा विचार केला तर जास्तीत जास्त 2400 रुपये आणि किमान 660 रुपये भरावे लागतात. हे पैसे पी एम किसान सन्मान निधी चा 6000 पण मधून कापले जातात.
Share your comments