राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे त्यांना वाटत होते. असे असताना महाविकास आघाडी सरकारकडून जाता जाता नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.
यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र आता आलेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने याची अंमलबजावणी न केल्याने शिवसेनेकडून आंदोलन केले आहे. शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये महापूजा घालून निषेध करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
सध्या सुरू असलेले अधिवेशनात शिवसेनेकडून हा मुद्दा आज उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे या सरकारला सुबुद्धी देण्यासाठी लक्ष्मीकडे प्रार्थना केली. दरम्यान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात फडणवीसांसाठी चाचपनी, केंद्रात दिली मोठी जबाबदारी
असे असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा झालेले नाहीत. याच्या निषेधार्थ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने महापूजा घालून निषेध करण्यात आला. यामुळे आता हे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी'
विनायक मेटेंच्या भाच्याच्या दाव्याने खळबळ! म्हणाले, तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच...
कोरोना वाढतोय! प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, वाचा आता नवीन नियम..
Share your comments