कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट कोसळले. यामुळे प्रत्येकांना मोठी अडचणींना सामोरे जावे लागले. अशात आता प्रत्येकालाच भविष्याची चिंता आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट कोसळले. यामुळे प्रत्येकांना मोठी अडचणींना सामोरे जावे लागले. अशात आता प्रत्येकालाच भविष्याची चिंता आहे. पण चांगली गुंतवणूक केली तर चांगला फायदाही होतो. पण कशात गुंतवणूक (Investment) करणे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही लाखोंनी पैसे कमवू शकता.
तुम्ही २० वर्षांचे असाल तर दररोज वाचवा ३० रुपये
तुम्ही जर २० वर्षांचे असाल तर दररोज ३० रुपयांची बचत करून साठव्या वर्षी तुम्ही करोडपती बनू शकता. दिवसाला ३० रुपये ठेव म्हणजे महिन्यात ९०० रुपयांची बचत करावी लागेल. दरमहा एसआयपी (Systematic Investment Plan) मध्ये रक्कम गुंतवून तुम्ही भविष्यात चांगला नफा मिळवू शकता. याचा अर्थ असा की ४० वर्षांसाठी, दरमहा फक्त ९०० रुपये गुंतवून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
समजा तुम्ही २० वर्षांचे आहात. ४० वर्षांसाठी दररोज ३० रुपयांची बचत केलीत. म्हणजेच दरमहा म्युच्युअल फंडामध्ये ९०० रुपयांची गुंतवणूक होते. म्युच्युअल फंडामध्ये सरासरी १२.५ टक्क्याने रिटर्न मिळते. त्यामुळे अशी गुंतवणूक केल्यास ४० वर्षांनंतर तुम्ही कोट्याधीश असाल.चाळीस वर्षांपर्यंत बचत करणे हा जर लांबचा पल्ला वाटत असेल तर तुम्ही कमी वर्षांसाठीही गुंतवणूक करू शकता. यामध्ये सरासरी परतावा १२ टक्क्यांपर्यंत असू शकतो. जर तुम्ही ३५ वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन (DRIP) मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला १५% रिटर्न मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडांऐवजी तुम्ही छोट्या किंवा मिडकॅप फंडातही गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक २५-३० वर्षांपेक्षाही कमी असते.
RD देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
RD देखील गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. दरमहा ५५०० रुपयांची आरडी जमा करुनही तुम्ही कोटींनी कमवू शकता. यासाठी सगळ्यात आधी बँकेत आरडी खाते उघडा आणि दरमहा रक्कम जमा करा. यामध्ये दरवर्षी तुम्हाला ९ टक्के व्याज मिळाले तर फक्त ३० वर्षांत तुम्ही भरभक्कम परतावा मिळवू शकता.
Share your comments