1. बातम्या

Pm Kisan : "या" कारणांमुळे पीएम किसान सन्मान निधीचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही, वेळीच करा दुरुस्ती

2014 मध्ये भारतात सत्तापरिवर्तन झाले, वर्षानुवर्षे सत्तेवर काबीज असलेल्या काँग्रेस (Congress) पार्टीला मोठ्या अंतराने भाजपाने सत्तेबाहेर केले आणि देशावर भाजपाची (Bhartiy Janta Party) सत्ता आली. सत्तेत आल्यापासून केंद्रातील भाजपच्या सरकारने अर्थात मोदी सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या. अशाच नाविन्यपूर्ण योजना पैकी एक आहे पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna). या योजनेद्वारे देशातील जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत केली जाते. या योजनेसाठी महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांना ही मदत सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने या योजनेला एक वेगळीच पारदर्शकता लाभली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्त्यात सहा हजार रुपये प्रदान केले जातात. शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हफ्ते दिले जातात. आज एक जानेवारी 2022 भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी (Prime Minister Hon'ble Shri Narendraji Modi) यांनी आपल्या करकमलांनी या योजनेचा दहावा हफ्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pm kisan sanman nidhi yojna

मात्र असे असले तरी अनेक शेतकरी या योजनेसाठी पात्र असून देखील त्यांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा होत नाही. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असून देखील अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे आज आपण पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का मिळत नाही याचे कारणे व त्यावरील उपाय योजना सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे खात्यात जमा न होण्याची कारणे

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा होत नाहीत यासंदर्भात कृषी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता, त्यांनी योजनेचे पैसे अटकण्याचे अनेक कारणे सांगितली आहेत, ते कारणे खालीलप्रमाणे आहेत.

  • कृषी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनुसार (According to the officials of the Ministry of Agriculture), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी फॉर्म भरताना जर चुकीची माहिती भरली गेली असेल तर या योजनेचे पैसे पात्र शेतकर्‍यांना मिळत नाहीत, म्हणून योजनेसाठी फॉर्म भरताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
  • या योजनेसाठी फॉर्म भरताना शेतकऱ्यांनी बँक डिटेल्स (Bank details) व्यवस्थित रित्या भरणे आवश्यक आहे. बँकिंग डिटेल्स व्यवस्थित न भरल्याने देखील अनेक शेतकऱ्यांचे पैसे अटककल्याचे समोर आले आहे. बँकिंग डिटेल भरताना आयएफएससी (IFSC Code) कोड काळजीपूर्वक भरणे आवश्यक ठरते.
  • तसेच शेतकऱ्यांनी त्याच बँकेचा खाते नंबर (Bank account number) फॉर्म मध्ये भरणे अनिवार्य आहे जे बँक खाते सध्या चालू आहे. याशिवाय बँकेचा खाते क्रमांक व्यवस्थितरित्या प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • अनेकदा बँक खाते अवैध (Bank account invalid) असल्याने पीएम किसान सम्मान निधि योजनाचे पैसे खात्यात जमा होत नाहीत, त्याला तात्पुरती स्थगिती दिली जाते. यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा पैसा दिला जातो.
  • अनेकदा शेतकरी बांधव बँक खाते नंबर चुकीचा टाकतात त्यामुळे असे खाते बँकेत अस्तित्वात नसल्याने योजनेचा पैसा त्यांच्या खात्यावर जमा होत नाहीत.
  • सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली (Public finance management system) या सरकारी कमिटीने शेतकऱ्यांना योजनेसाठी अपात्र ठरवल्यास देखील या योजनेचा पैसा मिळत नाही.
  • बँकेत व्यवहार न झाल्याने बँक खाते बंद करून टाकते, आणि याची माहिती शेतकऱ्यांना नसते त्यामुळे या योजनेचा पैसा अटकतो.
  • तसेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (National Payment Corporation of India) आधार सीडिंग करण्यात आलेली नसल्यास देखील या योजनेचा पैसा अटकतो.
English Summary: because of these reasons pm kisan sanman nidhi yojnas installment is not going to farmers account Published on: 01 January 2022, 03:19 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters