1. बातम्या

खरं काय! सोशियल मिडियावर पसरली सैन्य भरतीची अभवा; हजारो युवा पोहचले नाशिक

सोशियल मिडिया हे अलीकडे विचारांची देवाण घेवाण करण्याचं एक प्रमुख व्यासपीठ म्हणुन उदयाला आले आहे. आजच्या काळात असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल जो सोशियल मिडीयाचा वापर करत नसेल, सोशियल मिडिया आजच्या आधुनिक युगात एक गरजेचे माध्यम आहे असे असले तरी याचा अनेकदा चुकीचा वापर होताना दिसतो यामुळे अनेक सुशिक्षित लोक सुद्धा अफवांना बळी पडतात. याचेच एक उदाहरण समोर आले आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात. त्याचं झालं असं की सोशल मीडियावर सैन्य भरती होणार या संदर्भात एक अफवा वेगाने पसरली त्यामुळे अनेक इच्छुक लोक नाशिक शहरात येऊ लागले. परिस्थिती एवढी बिकट पडली होती की नासिक रेल्वे स्टेशन वरती इच्छुक मुलांची गर्दी मावत नव्हती.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
army bharti

त्याचं झालं असं की सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल झाला त्यात लिहिले होते की 16 ते 18 डिसेंबर या दरम्यान नासिक मध्ये टी ए बटालियन ची भरती होणार आहे, यासंदर्भातील एक पोस्टर नाशिक शहरात देखील लावले गेले होते. हा मेसेज ज्या मुलांनी वाचला ते लागलीच नाशिक मधील देवळाली कॅम्प मध्ये भरती साठी येऊ लागले. देवळाली मध्ये मोठ्या संख्येने मुलांची गर्दी जमली होती, तिथे गेल्यानंतर मुलांना समजले की ही बातमी साफ खोटी आहे आणि यासंदर्भात सोशल मीडियावर एक अफवा पसरत आहे. सेना च्या वतीने अद्यापतरी कुठलीही भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत नाहीय. असे सांगितले जात आहे की या अफवेवर विश्वास ठेवून खूप लांबून इच्छुक मुले आले होते.

या संपूर्ण प्रकरणात नाशिक शहराचे पोलीस अधीक्षक यांचे म्हणणे आहे की, बाहेरून येणाऱ्या मुलांकडून त्यांना असे समजले की नाशिक शहरात टीए बटालियन ची भरती होणार आहे, अशी अफवा सोशल मीडियावर कोणीतरी पसरवली आहे. नाशिकच्या देवळाली पोहोचलेल्या इच्छुक मुलांना  जेव्हा हे वास्तव समजले तेव्हा त्यांना खूप निराशा झाली. पोलीसांनी ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा तपास घेण्यास सुरवात केली आहे. तिथे जमलेल्या तमाम युवकांना पोलिसांनी सांगितले की अफवेवर विश्वास ठेवू नका, सोशियल मिडियावर वायरल होत असलेल्या मेसेजची आधी पडताळणी करूनच काय तो निर्णय घ्यावा. तिथे आलेल्या मुलांना पोलिसांनीच सेना कुठलीही भरती घेत नाही ही माहिती दिली. 

देवळाली कॅम्पला आलेल्या सर्व इच्छुक तरुणांना योग्य माहिती देऊन पोलिसांनी त्यांना आपापल्या घरी पाठवले तसेच त्यांना सल्ला दिला अफवाना बळी पडू नका आधी आलेल्या बातमीची सत्यता तपासा आणि मग योग्य तो निर्णय घ्या. तिथे आलेल्या मुलांनी खूप निराशा झाल्याचे यावेळी सांगितलं. अनेक मुले शेकडो किलोमीटरचा प्रवास करून सैन्यात भरती होण्यासाठी आले होते, अनेक तरुण बेरोजगारी मुळे त्रस्त आहेत म्हणुन अशा तरुणांना आपली बेरोजगारी दूर होईल असे वाटत होते, पण ह्या अफवेमुळे त्यांच्या पदरी निराशा आली.

English Summary: because of social media rumors hundreds of unemployment people gathered in nashiks devlali camp as they came to know that army taking bharti Published on: 17 December 2021, 10:02 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters