रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या देशातून होणारी आयात निर्यात मंदावली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा विपरीत परिणाम होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा सर्वाधिक फटका आशिया खंडाला बसणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतात या युद्धामुळे महागाई पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालेल असे सांगितले जात आहे.
भारतात महागाईत 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे बजेट कोलमडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत होत्या, आणि आता या युद्धामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी काहीशी परिस्थिती बघायला मिळू शकते. आधीच महागाईमुळे मध्यमवर्गीय लोकांचे कंबरडे मोडले आहे.
त्यात आता आगामी काही दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गहू तेल आणि प्रॉडक्ट पॅक करण्यासाठी आवश्यक वस्तूंचे दर वाढल्याने एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनाच्या किमती येत्या काही दिवसात वाढवतील असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याआधी अनेक एफएमसीजी कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्टचे दर वाढवले देखील आहेत. या युद्धात तयार झालेल्या विपरीत समीकरणामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या युद्धामुळे सर्वात जास्त फटका एफएमसीजी कंपन्यांना बसल्याचे सांगितले गेले आहे यामुळे येत्या काही दिवसात महागाई पुन्हा एकदा विक्राळ रूप अंगीकारेल असे चिन्ह दिसू लागले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असल्याने मध्यमवर्गीय लोकांना थोडा का होईना दिलासा मिळत असल्याचे समजत आहे. परंतु असे असले तरी, यामध्ये देखील लवकरच दर वाढ होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
युद्धामुळे गहू खाद्यतेल तसेच कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. कच्चामाल महाग होत असल्याने तयार झालेला मालं पूर्वीच्या किमतीत विक्री करणे कंपन्यांना परवडणार नसल्यामुळे दरवाढ अटळ मानली जात आहे. या संदर्भात अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना दरवाढ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्पादनाच्या किमती वाढल्यास मध्यमवर्गीय लोकांचे पुन्हा एकदा बजेट कोलमोडू शकते.
हिंदुस्तान युनिलिव्हर ने देखील आपल्या प्रोडक्टची प्राईस ही आधीपेक्षा 15 टक्क्यांनी वाढवली आहे. यामध्ये चहा कॉफी साबण इत्यादी प्रोडक्टचा समावेश आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ अटळ असल्याचे समजत आहे.
संबंधित बातम्या:-
भाजपच्या काळातील चुकांमुळे वीजबिलाचा फुगवटा; सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांचा गंभीर आरोप
काहीही हं महावितरणा! शेतपंपाचे 33 लाखांचे काढले वीजबिल; शेतकऱ्याची झोपचं उडाली
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
Share your comments