भारतातील मोठ्या टायर कंपन्यांना काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने चांगलाच दणका दिला आहे. देशातील 5 मोठ्या टायर उत्पादक कंपन्यांना 1788.87 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परस्पर संगनमताने गटबाजी करून जादा दराने टायर विक्री केल्याबद्दल काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) ही कारवाई केलीय. यामध्ये एमआरएफ (MRF), सीएट (CEAT), जेके टायर्स, बिर्ला टायर्स, अपोलो टायर्स या नामांकीत कंपन्यांचा समावेश आहे.
कॉम्पिटिशन कमिशनने यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला आहे. कॉम्पिटिशन कमिशननेच्या अहवालानुसार टायर्सच्या किंमतींशी संबंधित गोपनीय महिती उघड केली. त्याच्या मदतीने टायर्सच्या किंमती सामूहिक पद्धतीने ठरवल्या. यामुळे बाजारात किंमती वाधारल्या आणि त्याचा थेट आर्थिक फायदा या कंपन्यांना झाल्याचा दावा करण्यात आलाय.
कॉम्पिटिशन ऍक्टमधील कलम तीनचे उल्लंघन केल्याचा आरोप कमिशनने केला. यासंबंधी 2018 मध्ये कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीआयतर्फे करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा कंपन्यांच्या वकिलांनी केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळून लावत कंपन्यांवरील दंड कायम ठेवला आहे.
कंपन्यांना झालेला दंड
१. एमआरएफ टायर्स 622.09 कोटी
२. सीएट लिमिटेड 252.16 कोटी
३. अपोलो टायर्स 425.53 कोटी
४. जे. के. टायर्स 309.95 कोटी
५. बिर्ला टायर्स 178.33 कोटी
Share your comments