Best Rice In The World : भारताच्या बासमती तांदळाला "जगातील सर्वोत्तम तांदूळ" म्हणून गौरवण्यात आले आहे. टेस्ट अॅटलसने २०२३-२४ च्या वर्षअखेरीच्या पुरस्कारांचा भाग म्हणून या सन्मानाची घोषणा केली. टेस्ट अॅटलसने त्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवरुन अर्थातच इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे देशात आणि देशाबाहेर आता बासमती तांदळाचा बोलबाला झाला आहे.
इन्स्टाग्रामवरुन तांदळाबाबत माहिती
टेस्ट अॅटलसने त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसंच फोटोच्या खाली त्यांनी काही माहिती लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, "बासमती ही मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेली आणि लागवड केली जाणारी लांब-दाण्याचा तांदूळ प्रकार आहे. तांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंधाने वैशिष्ट्यीकृत आहे, जे अतिशय पौष्टिक, खमंग आहे. तसंच किंचित मसालेदार आहे. एकदा तांदूळ शिजल्यानंतर तो एकमेकांना चिकटत नाही. ज्यामुळे त्याला विविध खाद्यपदार्थांच्या रेसीपीमध्ये आणि त्याचे खास पदार्थ करताना वापरला जातो. तांदूळ नावाचे हे धान्य जितके लांब तितकेच चांगले मानले जाते आणि सर्वोत्तम बासमती धान्यांचा रंग किंचित सोनेरी असतो."
बासमतीनंतर आर्बोरिया आणि कॅरोलिना तांदूळ
भारतातील बासमती तांदळाचा प्रथम क्रमांक आल्यानंतर दुसऱ्यास्थानी इटलीचा आर्बोरियो तांदूळ आणि पोर्तुगालचा कॅरोलिना तांदूळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या स्थानी स्पेनचा बोम्बा आणि पाचव्या स्थानी जपानचा उरुचिमाय तांदूळ आहे.
मँगो लस्सीही ठरली उत्तम डेअरी ड्रिंक
भारताच्या मँगो लस्सीला "जगातील सर्वोत्कृष्ट डेअरी ड्रिंक" म्हणून ओळखले गेले आहे. फूड गाइडनेयाबाबत सांगितले की, "लस्सीच्या अनेक प्रकारांपैकी ही गोड आंब्याची आवृत्ती देशाबाहेरील भारतीय रेस्टॉरंट मेनूमध्ये सर्वात सामान्य प्रकार आहे." तसंच या लस्सीचा देखील आता सर्वत्र बोलबाला सुरु आहे.
दरम्यान, जगातील १०० सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आणि प्रतिष्ठित डेझर्ट ठिकाणे या दोन्ही यादीमध्ये अनेक भारतीय नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रत्येक रेस्टॉरंटसाठी तुमच्या भेटीदरम्यान आवश्यक असलेले पदार्थ हायलाइट करण्यासाठी मार्गदर्शकामध्ये एक डिश देखील आहे, असं देखील टेस्ट अॅटलने नमूद केले आहे.
Share your comments