1. बातम्या

Basmati Rice: अतिवृष्टीमुळे खाद्यपदार्थाच्या किमती गेल्यावर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढल्या; बासमती तांदळाचे भाव वाढणार

Basmati Rice: देशात सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात भात पिकांची लागवड केली जाते. मात्र मुसळधार पावसाचा भातशेतीलाही फटका बसल्याने तांदळाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ

Basmati Rice: देशात सध्या खरीप हंगामातील (Kharip Season) पिकांची काढणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असल्यामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात भात पिकांची लागवड केली जाते. मात्र मुसळधार पावसाचा भातशेतीलाही (Rice farming) फटका बसल्याने तांदळाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत तांदूळ, गहू, मैदा यासारख्या धान्यांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने निर्यात बंद (export stop) केली, मात्र त्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अन्न मंत्रालयाने सांगितले की, अतिवृष्टीमुळे या वेळी या खाद्यपदार्थांच्या (foods) किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या काळात लोकांना खिसा आणखी मोकळा करावा लागणार आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते, तेव्हा शेतकऱ्यांची मेहनत वाहून जाते. कधी-कधी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर अशा प्रकारे कहर होतो की त्यांच्या शेतातील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होतात.

राज्यात ढगाळ वातावरण! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

तसेच देशाच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे देशातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे बासमती तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सुमारे 20 टक्के भातपिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात बासमती तांदळाचे भाव वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

याचा थेट परिणाम निर्यातीवरही होणार आहे. या पावसामुळे भाताचा दर्जाही गेला आहे, त्यामुळे शेतात पाणी आल्याने धान्य काळे पडू शकते किंवा कुजण्याचीही शक्यता आहे.

यावेळी झालेल्या अतिवृष्टीने भातपिकांची अशीच नासधूस केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासोबतच देशभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकातही लक्षणीय घट झाली आहे.

मुसळधार पावसाचा कहर! कापूस पिकाला मोठा तडाखा; शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

बासमती तांदळाची निर्यात

आपल्या देशातून जवळपास 150 देशांमध्ये बासमती तांदूळ निर्यात केला जातो. त्याची लागवड करणाऱ्या प्रमुख राज्यांबद्दल बोलायचे झाले तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांचे नाव पहिले येते.

याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, सहारनपूर, आग्रा, अलीगढ, मुरादाबाद, बरेली या सर्व जिल्ह्यांमध्ये बासमती तांदळाची लागवड केली जाते. येथील माती आणि हवामान बासमती तांदळाच्या लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंचनाची साधनेही सहज उपलब्ध होतात. इतकेच नाही तर बासमती तांदूळ इंडो-गंगेच्या मैदानात (IGP-Indo-Gangetic Plains) म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गंगेच्या मैदानातही तयार होतो. त्यात पाकिस्तानचा भाग असलेल्या पंजाबमधील 14 जिल्ह्यांचाही समावेश आहे.

जाणून घ्या काय आहे बासमती तांदळाची खासियत

बासमती तांदूळ त्याच्या अद्वितीय चव आणि गुणधर्मांमुळे जगभरातील खाद्य आणि रेस्टॉरंट उद्योगात एक प्रीमियम तांदूळ म्हणून अस्तित्वात आहे. हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशातील 30 आणि जम्मू आणि काश्मीरमधील (जम्मू, कठुआ आणि सांबा) 3 जिल्ह्यांसह 7 राज्यांतील 95 जिल्ह्यांमध्ये त्याला GI टॅग मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या:
कांद्याचा वांदा! कांद्याला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही; जाणून घ्या कुठे किती मिळतोय दर?
सणासुदीच्या काळात खरेदी करा या स्वस्त सीएनजी; इंधनाचा खर्च होईल झटक्यात कमी

English Summary: Basmati Rice: Food prices rise 20 percent over last year due to heavy rains Published on: 26 September 2022, 05:10 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters