अनेक ठिकाणी लोकहिताच्या कामासाठी आलेली निधी गैरमार्गाने वळवून त्याठिकाणी भ्रष्टाचार केला जातो. यामुळे अनेक ठिकाणी कामे रखडतात. आता भांडार जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील महालगाव, मोरगाव (Mahalgaon in Mohadi taluka) गटग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात गावकरी एकत्र आले आहेत. यामुळे याप्रकरणाची चर्चा सुरु आहे.पांदण रस्ते तयार न करता पैशाची उचल करणाऱ्या सरपंच व पदाधिकाऱ्यांवर कारवाई मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अजूनही कोणी दखल घेलती नाही, यामुळे पंचायत समितीसमोर उपोषणाचे हत्यार उगारण्याची तंबी देण्यात आली आहे. गावातील लोकांना हाताला काम मिळाले पाहिजे या दृष्टिकोणातून शासनाने प्रत्येक गावात, खेड्यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( National Rural Employment Guarantee Scheme) राबविली जाते. मात्र ही योजना भ्रष्टाचाराचे कारण बनत आहे. यामध्ये स्थानिक लोक ग्रामीण रोजगार हमी योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे समोर येत आहे. यामुळे सध्या याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे.
मोहाडी तालुक्यातील महालगाव, मोरगाव येथे असेच काहीसे घडले आहे. याठिकाणी 10 ते 23 नोव्हेंबर 2021 या कार्यकाळात सुमारे 28 लाख रुपयाचे काम हजेरीपट एम.बी. तयार करण्यात आले. तसेच 28 लाख रुपयाचे देयके तयार करून रकमेची उचल करण्यात आली. असे असताना मात्र गावकऱ्यांनी या कामांची चौकशी केली असता गावात कामे झालेच नसल्याचे त्यांना दिसून आले आहे. यामुळे याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
तसेच यामध्ये अनेक पांदन रस्तांच्या कामांचा समावेश आहे. या कामावर गावातील स्थानिक लोकांना कामे मिळाले नसल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, रोजगार सेवक, ग्रामसेवक, तांत्रिक अभियंता यांनी संगणमत केले असल्याचे देखील म्हटले जात आहे. यामुळे हे पैसे गेले कुठे असा आरोप करण्यात आला आहे. तसेच याबाबत रक्कम काही विशिष्ट लोकांच्या खात्यावर जमा कशी झाली असाही प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तसेच बँक स्टेटमेन्ट संपूर्ण कागदपत्रे तयार आहेत, यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.
Share your comments