वातावरणातील बदल, ढगाळ वातावरण तसेच मध्ये मध्ये येणारा पाऊस या सगळ्या नैसर्गिक संकटांच्या चक्रामध्ये केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केळीला वेळत मागणी नसल्याचे कारण पुढे करत व्यापारी केळी तोडणीला येत नसल्याने केळीची झाडावरच पिकत असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात केळी चक्क तीन रुपये दराने शेतकऱ्यांना परवडत नसतानाही व्यापाऱ्यांना देण्यास तयार आहेत. परंतु मागणी नसल्याने व्यापारी केळी काढण्यास तयार नसल्याने केळीचे घड झाडावरच पिकत आहेत
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हे केळी पिकण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे.
उत्पादन खर्च पाहता लक्षात येईल केळी उत्पादकांचीअवस्था
केळी पिकाचा जर एकरी लागवडीपासून खर्चाचा विचार केला तर 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो.
यामध्ये हातात उत्पन्न यायच्या वेळेस व्यापाऱ्यांनी मनमानी करत केळी घ्यायला व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत असल्याने प्रशासनाने व्यापारी तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या बैठकीत मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. व्यापारी येत नसल्यामुळे सोन्यासारखे पीक हातातून जात आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारने काहीतरी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.(संदर्भ-एबीपीमाझा)
Share your comments