शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी बिहार सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे.
राज्य सरकार टिश्यू कल्चर पद्धतीनं केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे. बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
एक हेक्टरमध्ये केळीची लागवड करण्यासाठी सुमारे 1.25 लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चावर राज्य सरकार 50 टक्के अनुदान देते. शेतकर्यांची थेट 62500 रुपयांची बचत होणार आहे. म्हणजेच निम्मी रक्कम शेतकर्यांकडून आणि अर्धी रक्कम राज्य सरकारच्या पातळीवरुन दिली जाणार आहे.
एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते.
ऊस मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा, पोलिस महानिरीक्षकांचा मोठा निर्णय...
त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते. यामध्ये कमी वेळात केळीची झाडे तयार केली जातात. झाडे अधिक निरोगी असतात. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
पुण्यात 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त, अन्न व सुरक्षा विभागाची मोठी कारवाई..
आता जयंत पाटील हाजीर हो! राष्ट्रवादीला मोठा धक्का
पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एका महिन्यात १३०० कोटींचे पीककर्ज, शेतकऱ्यांना दिलासा..
Share your comments