Banana Rate : खानदेशात केळीचे दर टिकून राहण्याचा अंदाज, पाहा किती मिळतोय दर
आगामी काळ हा सणासुदीचा असून केळीला चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. तसंच जुलै महिन्यात देखील देशातून केळीची परदेशात निर्यात सुरु होती तर त्यांचा काही दरावर परिणाम झाला नााही. आरोग्यसाठी उत्तम फळ म्हणून केळीला चांगली मागणी आहे.
खानदेशात कांदेबाग केळी पिकातून काढणी सुरू आहे. यंदा केळी काढणीच्या दिवसांमध्ये सणासुदीचे दिवस असल्याने केळीला चांगला उठाव कायम राहिला आहे. शिवाय कांदेबाग केळीची आवक खानदेशात कमी असते. यामुळे दर टिकून राहतील, अशी स्थिती आहे.
सध्या स्थानिक किंवा राज्यातील विविध भागांत पाठवणुकीच्या केळीचे दर ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. किमान दर ८०० रुपयांवरच आहेत. केळीला उठाव कायम आहे.
दरम्यान, आता काही दिवसांतच श्रावण महिना सुरु होतोय. त्यामुळे पुढील महिनाभर केळीला चांगला दर राहण्याचा अंदाज जानकारांनी व्यक्त केला आहे. तसेच गौरी, गणपती, नवरात्रोत्सव, लागलीच दसरा व दिवाळीचा सण असणार आहेत. या सणासुदीला धार्मिक बाबींमध्ये केळीची मागणी असते. त्यामुळे दर चांगले राहतील.
English Summary: Banana prices in Khandesh expected to remain stable see how much the price is gettingPublished on: 10 August 2023, 01:48 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments