सध्या केळीच्या भावात बऱ्यापैकी सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.सध्या तापमानात वाढ होत असल्याने केळीचे दर चांगले वाढलेले आहेत.
जवळ जवळ जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर हे दर 1000 ते अकराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना समाधान लावत असताना एक नवीनच प्रकाराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सध्या केळी काढण्याचे काम चालू असताना अज्ञातांकडून केळी बागा उद्ध्वस्त केल्या जात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा या मागणीसाठी रावेर पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला होता
या अज्ञातांकडून केळीचे नुकसान होत नाही तर हे चोरटे शेतीला आवश्यक असलेल्या साहित्याची देखील मोडतोड करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार रावेर तालुक्यात सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेतया चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा या मागणीसाठी रावेर तालुक्यातील शेतकरी रावेर येथे पोलिस स्टेशन समोर ठिय्या देऊन बसले होते या दरम्यान शेतकऱ्यांसोबत खासदार रक्षा खडसे तसेच स्थानिक आमदार देखील सहभागी झाले होते.
अगोदरच नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना बागा टिकवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यातच आता तोंडाशी आलेला घास अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांच्या कडून हिरावला जात असल्याने शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेले कष्ट व झालेला खर्च देखील मातीमोल होत आहे.
Share your comments