महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे. आधी अतिवृष्टीने खरीपच्या हंगामात जोरदार मुसंडी मारली आणि संपूर्ण खरीप हंगामातील पीक मातीमोल केले. शेतकरी राजाने कसेबसे यातून स्वतःला सावरले आणि रब्बीकडे वळला. खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील केळीच्या बागा ह्या वाचल्या. पण आता मात्र पावसाने परत जिल्ह्यात अवेळी हजेरी लावली आणि केळीच्या बागा उध्वस्त झाल्या
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सोन्यासारख्या पिकाला अगदी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते, मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडातला घास हिरावून घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अवकाळी मुळे व बदलत्या हवामानमुळे केळी पिकावर अनेक बुरशीजणीत रोग लागत आहेत, त्यापैकीच एक रोग आहे करपा. करपा रोगामुळे केळीच्या बागा ह्या मातीमोल होत आहेत. या रोगामुळे केळीची पाने हि करपत आहेत आणि यामुळे केळी उत्पादक शेतकरी निश्चितच चिंतेत सापडले आहेत.
करपामुळे केळी उत्पादक शेतकरी सापडले अडचणीत
नांदेड जिल्ह्यात अवकाळी मुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्यासमवेत केळी पिकाला जोराचा फटका बसला आहे. हा करपा रोग केळी पिकाच्या खोडावर हल्ला करत आहे, त्यामुळे कांदा व केळी उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. करपा रोगामुळे केळीचे पाने आणि खोड करपून जात आहे त्यामुले याचा परिणाम हा सरळ उत्पादनावर होणार आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर येण्याचे चित्र दिसत आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात, यावर्षी देखील लक्षणीय लागवड ह्या तालुक्यात झाली होती मात्र हजारो हेक्टरवर असलेली केळीची हि लागवड अवकाळी पावसामुळे चांगलीच प्रभावित झाली आहे. तालुक्यातील केळी पीक हे अंतिम टप्प्यात होते, त्यामुळे अवकाळीने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतला आहे असेच म्हणावे लागेल.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट मात्र खर्चात वाढ
पारंपरिक पिकातुन चांगली कमाई होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी फळबागा लागवड करण्याचा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील असाच निर्णय घेतला आणि केळीच्या बागा लावल्यात, पारंपरिक पिकापेक्षा फळबागांना अधिक खर्च येतो, नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी देखील लाखोंचा खर्च केला पण एवढा खर्च करून अवकाळीमुळे त्यांच्या पदरी काहीच पडणार नाही असे दिसत आहे. अवकाळी मुळे आता करपा रोग केळी पिकावर अटॅक करत आहे, आणि त्यामुळे अजून खर्चात वाढ होणार आहे, आणि एवढा खर्च करून केळी पिकातून किती कमाई होईल हे अजूनच पडद्यामागेच दडले आहे.
Share your comments