1. बातम्या

माढाच्या केळीची इराण व अन्य देशांमध्ये निर्यात,उत्पादकांना मिळत आहे चांगला नफा

महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सध्या केळीचे लागवड वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा व इतर परिसर देखील केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या केळीला स्थानिक बाजारांमध्येअवघा सात ते आठ रुपये प्रति किलो दर मिळत आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
banana crop

banana crop

 महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सध्या केळीचे लागवड वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा व इतर परिसर देखील केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या केळीला स्थानिक बाजारांमध्येअवघा सात ते आठ रुपये प्रति किलो दर मिळत आहे

.याला पर्याय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माढा व इतर भागातून येथील केळी उत्पादक शेतकरी केळीची इराण व अन्य देशांमध्ये निर्यात करीत आहेत.गेल्या दोन महिन्यात जवळ जवळ या भागातील 53 शेतकऱ्यांनी स्थानिक व्यापार यांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून केळीची निर्यात केली आहे.निर्यात झालेल्या या केळीलातेथे 11 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे.

त्यामुळे माढा तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील अनेक शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. त्याबाबत तेथील व्यापारी मनोज चिंतामणी यांनी दिव्य मराठीशी बोलताना म्हटले आहे की, माढा तालुक्यातील पिंपळनेर परिसरातून रोज 40 टन केळी निर्यात होत आहे. स्थानिक बाजारात सध्या केळीला प्रति किलो पाच ते सहा रुपये दर आहे परंतु इराण,इराक इतर आखाती देशांमध्ये  एका किलोला 11 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.

याबाबतची अधिक माहिती देताना नवनाथ शिंदे हे शेतकरी म्हणाले की, केळीच्या दर्जेदार रोपांची निवड,सेंद्रिय खतांचा वापर,पाणी आणि विद्राव्य खतांचे तज्ञांच्या सहाय्याने योग्य नियोजनामुळे केळीच्या झाडांची चांगली वाढ झाली. केळीचे घडांचा आकार एकसारखा मिळाला  व केळीची प्रतही चांगली आहे.रोपे,खते, कीटकनाशके इत्यादींसाठी एकरी95 हजारांचा खर्च झालेला आहे. 40 ते 45 टन केळीचे उत्पादन हाती येणार आहे.प्रतिटन दहा ते अकरा हजार रुपये भाव मिळत असल्याने खर्च वजा जाता सव्वा एकरात तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.(संदर्भ-कृषीरंग)

English Summary: banana of madha in solapur district export at iraan and other country Published on: 14 January 2022, 12:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters