राज्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग पिकांची लागवड केली जाते. उत्पादनवाढीच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील फळबाग क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात केळी, द्राक्षे, डाळिंब इत्यादी फळांच्या बागा नजरेस पडतात. राज्यात फळबाग पिकांपैकी प्रमुख असलेल्या केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात नजरेस पडतात, केळीचे उत्पादन खानदेश समवेतच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या हंगामात मात्र केळीच्या बागा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रभावित झाल्या आहेत.
खरीप हंगामात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे तसेच मध्यंतरी झालेल्या अवकाळी मुळे व त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे केळीच्या बागांवर अनेक रोगांचे सावट नजरेस पडले होते, या रोगांपैकी करपा हा प्रामुख्याने बघायला मिळाला होता. करपा रोगामुळे केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान नमूद करण्यात आले. निसर्गाचा लहरीपणा केळी उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत होता आणि अशातच केळीचे दर कमालीचे घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठे हतबल झाले. मध्यंतरी केळीला मात्र चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत होता, या एवढ्या तुटपुंजी दरामुळे केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र बघायला मिळाले होते.
हे देखील वाचा:- Cotton Growers: कापसाच्या वाढत्या दराला मायबाप सरकारचा देखील छुपा …
सध्या वातावरण चांगले स्वच्छ आणि निरभ्र बनत आहे, त्यामुळे तापमानात चांगली वाढ होत आहे आणि तापमानात वाढ झाल्याने केळीच्या मागणीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात हवामानात होत असलेला अनुकूल बदल केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. वातावरण जसे निवळत चालले आहे तसतसे केळीच्या मागणीत वाढ होत असून केळीचे दर देखील चांगले वाढत आहेत. सध्या केळी उत्पादक शेतकर्यांचा अपेक्षेपेक्षा अधिक बाजार भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. अकोला जिल्ह्यात केळीला चांगला समाधानकारक बाजार भाव प्राप्त होत आहे सध्या जिल्ह्यात केळीला अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. केळीला चांगला समाधानकारक बाजार भाव तर मिळतच आहे शिवाय केळीचा सौदा देखील वावरातच होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी येणारा खर्च कमी होत आहे. त्यामुळे केळीच्या बागांसाठी केलेला लाखोंचा खर्च आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अपार कष्ट फळशृतीस येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यासमवेतच केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्या खान्देशात देखील केळीला चांगला समाधानकारक बाजार भाव प्राप्त होत आहे.
हे देखील वाचा:-आंनदाची बातमी! एचटीबीटी कॉटन आता भारतात देखील होणार उत्पादीत, केंद्र शासन अनुकूल; कापुस उत्पादकांना मिळणार फायदा
कृषी तज्ञांच्या मते, केळीच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आंध्रप्रदेश राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे तसेच मध्यंतरी राज्यात तयार झालेले ढगाळ व थंडीचे वातावरण सध्या निवळत असल्याने केळीच्या मागणीत आधीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे, केळीच्या मागणीत वाढ झाल्याने केळीचे दर देखील आधीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारी केळी आजच्या घडीला अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. राज्यात तयार झालेल्या या एकत्रित समीकरणामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकरी चांगले सुखावले आहेत.
सध्या केळीचा हंगाम प्रारंभीच्या टप्प्यात आहे, आणि सुरुवातीलाच केळीला चांगला दर मिळत असल्याने या हंगामात केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगली भरघोस कमाई होण्याची आशा आहे. या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची आशा व्यक्त केली होती मात्र शेतकऱ्यांनी आपल्या अपार कष्टाने आणि लाखों रुपयांच्या खर्चाने केळीच्या बागा वाचवल्या आहेत आणि आता केळी खरेदीसाठी व्यापारीच बांधावर येत असून अपेक्षेपेक्षा अधिक बाजारभावात केळीची खरेदी करत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Share your comments