1. बातम्या

केळी पीक विमा परतावाचे निकष बदलणार; उपमुख्यमंत्र्याने दिले आदेश

KJ Staff
KJ Staff


हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत केळी पिकासाठी यंदा लागू केलेले निकष तातडीने बदला. याविषयी  लवकर बैठक घ्या, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयातील वरिष्ठांना दिले. तसेच या प्रश्नी आपण सातत्याने पाठपुरावा करु,अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना जळगावाला दिले.दरम्यान जळगाव जिल्ह्यातील  शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईत केळी पिकासंबंधी परतावा निकष बदलावेत, यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले.

या शेतकऱ्यांमध्ये राहुल पाटील, विकास महाजन आदींचा  समावेश होतो.  त्यात केळी पिकासाठी लागू केलेले निकष विमा कंपनीच्या फायद्याचे व शेतकऱ्यांना लाभ न मिळवून देणारे असल्याचे मुद्दे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. या योजनेसंबंधी विमा हप्ते स्वीकारण्याचे काम १५ ऑक्टोबरपासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सूरु राहील. त्यापुर्वीच हे निकष बदलले गेल्यास चांगला फायदा होईल, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली.यावर पवार यांनी कृषी मंत्रालयातील वरिष्ठांशी संवाद साधला.त्यात हे निकष बदला व लवकर यावर बैठक घ्या,अशा सुचना दिल्या. पण मंत्रालयातील वरिष्ठांनी हे निकष आता पुढील वर्षी बदलता येतील,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यावर पवार यांनी शेतकरी  हिसासंबंधी कार्यवाही करा,असे अधिककाऱ्यांना सांगितल्याची माहिती शेतकरी राहुल पाटील यांनी दिली.

दरम्यान केळी पिकसंबंधी विमा योजनेत राज्य शासनाने लागू केलेल्या निकषासंबंधी जळगाव येथील विमानतळवर केली उत्पादक  महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, सत्वशील पाटील आदींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात केळी उत्पादकांची साथ देणाऱ्या पक्षालाच किंवा नेत्याला केळी उत्पादक पुढे मदत करतील साथ देतील, असा पवित्रा शेतकऱ्यांनी  घेतला. त्यावर पडणवीस म्हणाले की, आपण याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. पुढेही यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी  काम करील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

 

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters