केळी हे पीक महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात घेतली जाते. प्रामुख्याने जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु जर आपण केळी पिकाचा विचार केला तर बऱ्याच वर्षापासून केळी पिकाला अपेक्षित भाव मिळत नव्हता.
त्यामुळे बर्याच प्रमाणात लागवड क्षेत्रात घट झालेली पाहायला मिळत होती. परंतु यावर्षी मागील सात वर्षांचा उच्चांक मोडीत केळी ने भावाची पातळी गाठली आहे.
त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आनंदी झाला असून यापुढील काळात केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ होईल अशी परिस्थिती आहे.
जर आपण आजच्या केळीच्या भावाचे स्थिती पाहिली तर 15 किलोच्या केळीच्या घडाला जवळजवळ सतराशे पन्नास रुपये पर्यंत भाव मिळत आहे तर बऱ्हाणपूर या परिसरात हाच भाव दोन हजार तीनशे रुपयांच्या जवळपास आहे.
केळीच्या लागवड क्षेत्रात झाली होती घट
केळीचे भाव सातत्याने घसरत होते त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या पिकांकडे वळवला होता.
या बाबतीत आपण अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट या ठिकाणी सुरू असलेल्या केळी पुरवठादारांना दुसऱ्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आधार घेऊन आपला व्यवसाय सुरु ठेवावा लागला.
या सगळ्या प्रयत्नांमुळे रोज पथरोट वरून तीस ट्रकच्या आसपास केळी परराज्यात पाठवण्यात येत होती. परंतु नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे केळीच्या उत्पादनात सातत्याने कमी होत होती व त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या ट्रक चा आकडा हा सात ते आठ ट्रक वर येऊन पोहोचला आहे.
आता या परिसरात बोटावर मोजण्याइतके केळी उत्पादक शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत.
परंतु आता केळीला चांगला भाव मिळत असल्यामुळे तसेच पाण्याची मुबलक व्यवस्था असणारे शेतकऱ्यांनी यावर्षी केळी लागवडीची तयारी सुरू केली असून लागवड क्षेत्रात वाढ होईल अशी चिन्हे आहेत.
यावर्षी केळीला मिळणाऱ्या भावाचा विचार केला तर गेल्या सात वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त भाव असून केळीचे उत्पादन मात्र कमी आहे त्यामागे अतिउष्ण तापमान हे देखील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे ही भाव वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा:खुशखबर! धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Share your comments