अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या किटकनाशकांच्या विक्री, वितरण व वापरास बंदी

Friday, 20 September 2019 08:32 AM


मुंबई:
किटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या किटनाशकांची पुढील दोन महिन्यांसाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिली.

अमरावती जिल्ह्यात काही किटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ही किटकनाशके अतिविषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. या किटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस 40 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 40 टक्के ईसी, फिप्रोनील 40 टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड 40 टक्के डब्ल्यूजी, ऍसिफेट 75 टक्के एससी, डीफेन्थीरोन 50 टक्के डब्लुपी, मोनोक्रोटोफॉस 36 टक्के एसएल आदींचा समावेश आहे.

किटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनेची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता किटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास  बंदी घालण्यात आली असल्याचे कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले. धोकादायक किटकनाशकांची विक्री, वितरण व वापर यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून किटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजूर यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही मंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.

pesticides Dr. Anil Bonde डॉ. अनिल बोंडे किटकनाशके Amravati अमरावती

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.