Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Resignation) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनाम्याचं शस्त्र उपसलं आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचामधील वाद विकोपाला गेला आहे. आता हा वाद थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्लीला पाठवला आहे.
अजून हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे, अशा आशयाचं पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठवलं होतं. त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस बाहेर आली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे.पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.
FD चे दर वाढले, आता महिला ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 'इतका' परतावा
सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता नाना पटोलेंसोबत काम करू शकत नाही,असं आपण पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मात्र, आता थोरातांचा राजीनामा काँग्रेसचे हायकंमाड स्वीकारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
एका दिवसात 72 लिटर दूध देते ही गाय! बक्षीस म्हणून मालकाला मिळाला ट्रॅक्टर, अँग्री एक्स्पोमध्ये कमाल
Share your comments