MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

टोमॅटो उत्पादकांसाठी केंद्राची बाजार हस्तक्षेप योजना; जाणून घेऊ त्याबद्दल

गेल्या काही दिवसांपासून कोसळलेले टोमॅटोचे दर आणि टोमॅटोची वाढलेली प्रचंड आवक यामुळे नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील विविध भागांमध्ये टोमॅटो रस्त्यावर फेकण्याचे प्रकार घडले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tommato

tommato

गेल्या काही दिवसांपासून कोसळलेले टोमॅटोचे दर आणि टोमॅटोची वाढलेली  प्रचंड आवक यामुळे नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील विविध भागांमध्ये  टोमॅटो रस्त्यावर फेकण्याचे  प्रकार घडले.

 याप्रसंगी संतप्त शेतकऱ्यांकडून आंदोलन उभे राहू पाहत असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री व वाणिज्य मंत्र्यांशी संपर्क साधून सदर परिस्थितीची कल्पना दिली असता केंद्र सरकारने यासंदर्भात बाजारात हस्तक्षेप योजनेअंतर्गत राज्य सरकारने मागणी केल्यास या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार असून, त्यासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने टोमॅटो व बटाटा या नाशवंत फळ भाज्यांसाठी केंद्र सरकारच्या बाजार हस्तक्षेप योजना चा हवाला दिला आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार 50 टक्के तर केंद्र सरकार 50 टक्के आर्थिक भार उचलू शकते असे नमूद करण्यात आले आहे. परंतु त्यासाठी अशी आहे की टोमॅटो व बटाट्याची गेल्या वर्षाचे उत्पन्नापेक्षा यावर्षी दहा टक्के उत्पादनात वाढ झाली पाहिजे व किमतीत दहा टक्के घट व्हायला हवी.. त्यामुळे राज्यात टोमॅटोचे वाढलेले उत्पादन व कोसळलेल्या किमती पाहता केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी संपर्क साधून 

नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांवररस्त्यावर टोमॅटो फेकण्याची  वेळ आल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी या प्रश्नी तोडगा काढण्याचे मान्य केले आहे. राज्य सरकारने केंद्राला विनंती केल्यास बाजारात हस्तक्षेप योजनेअंतर्गत राज्य सरकारला तीन रुपये किलो या दराने टोमॅटोची खरेदी करावी लागेल व त्यासाठी येणार्‍या खर्चाचा केंद्र व राज्य सरकारने निम्मा भार उचलावा, अशा आशयाच्या सूचना करण्यात आले आहेत.

English Summary: bajaar hastkshep yojna for tommato rate Published on: 28 August 2021, 11:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters