आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशात अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात, असे असताना आता आंध्र प्रदेशात केळीच्या झाडाचा अनोखा नमुना पाहायला मिळाला. येथे तब्बल 7 फूट लांबीचे केळीचे स्टेम आढळून आले आहे. यामुळे परिसरात सध्या याची चर्चा सुरु आहे. सध्या याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. झाडापासून केळीचं स्टेम वेगळं केलं तर त्याचं वजन तब्बल 60 किलोग्रॅम भरलं आहे. यामुळे अनेकजण सेल्फी घेण्यासाठी येत आहेत.
एक व्यक्ती यातील केळी धरू शकत नाही. आंध्र प्रदेशातील कोथापल्ली येथील वाकटिप्पा गावात हे झाड लावण्यात आले होते. याबाबत अनेकांनी आश्चर्य वक्त केले आहे. त्याच वजन जास्त असल्याने सांभाळण अवघड झाले होते. या स्टेमला 140 केळी असून याचे वजन 60 किलो आहे. स्टेम उचलण्यासाठी अनेकांना बोलावण्यात आले होते. मालक सुदर्शनने सांगितले की, बंगळुरूत राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडून त्यांना हे केळीचे रोप मिळाले होते. आता अनेकजण याचे रोप त्यांच्याकडे मागत आहेत.
हे रोप लावल्यानंतर ते खूपच वाढले यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हे झाड 7 फूट लांबींच आहे. अनेक तरुण केळीच्या या भल्यामोठ्या स्टेमबरोबर सेल्फी घेत आहेत. सध्या या झाडाबाबत चौकशी केली जात आहे. येत्या काळात या झाडाला अधिक केळी येणार असल्याचे दिसत आहे. यामुळे या झाडाकडे सर्वांचे लक्ष असेल. अनेकजण याला बाहुबली झाड असे म्हणत आहेत. या झाडाने मोठा विक्रम केला असून आजपर्यत असे पीक कधी आले नव्हते, असेही सांगितले जात आहे.
राज्यात देखील केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जळगाव जिल्हा त्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र असे मोठे घड आजपर्यत कोणाच्या शेतात आले नव्हते. यामुळे यासाठी काय वेगळे खत वापरले गेले आहे का तसेच याचे व्यवस्थापन कसे केले गेले, याची सध्या चर्चा सुरु आहे. अनेक लोक लांबून हे पीक बघण्यासाठी येत आहेत. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.
Share your comments