भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या लखनौमध्ये असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सब-ट्रॉपिकल फलोत्पादन (सीआयएसएच) ने शेतकर्यांसाठी मोबाइल अॅप बाजारात आणले आहे. या मोबाईल एपचे नाव आहे बागवानी मित्र एप. हा एप कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांना मदत करेल. शेतकऱ्यांसह व्यावसायिकांसाठीही हा एप उपयोगाचा आहे.
या एपचे वैशिष्ट्ये म्हणजे अशिक्षित बळीराजाही हे एप वापरु शकणार आहे. या एपच्या उपयोगातून शेतकरी आपल्या पिकांची माहिती, त्यावर होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव याची माहिती जाणून घेऊ शकतील. जर एखाद्या शेतकऱ्याला शेती विषयी म्हणा किंवा पिकांविषयी काही समस्या असेल पण तो शेतकरी शिक्षित नसेल तरी तो तज्ञांचा सल्ला घेऊ शकणार आहे. कारण आपली समस्या आपल्याला टाईप करून सांगण्याची गरज नाही. आपण फक्त आपली समस्या बोलायची आहे. आपण जे बोलू ते आपोआप लिहिले जाईल.
त्यानंतर तज्ञ आपली प्रतिक्रिया देतील. उप-उष्णकटिबंधीय बागायती केंद्राचे संचालक, शैलेंद्र रंजन म्हणाले की, हा एप अशिक्षित शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या एपच्या माध्यमातून शेतकरी संदेशासह रोगांने प्रादुर्भाव झालेल्या पिकांचे फोटोही पाठवू शकणार आहेत. यामुळे वैज्ञानिकांना योग्य रोग ओळखण्यास मदत होईल. हे मोबाइल अॅप सामान्य कीटक, रोग आणि इतर समस्या तसेच त्यांच्या नियंत्रणाबद्दल माहिती देईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना हवामानाविषयी माहिती मिळणार आहे. यामुळे पेरणी करण्यासंबंधी शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
Share your comments