पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आता रोखीने अडचणीत असलेल्या देशाला आर्थिक मदत सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) शी संपर्क साधला आहे. याच्या काही दिवसांपूर्वी जनरल बाजवा यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 1.7 अब्ज डॉलरचे महत्त्वाचे मदत पॅकेज मिळविण्यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती.
असे असताना आता पाकिस्तानमध्ये पैसे नसल्याच्या कारणावरून प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचा विकण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. लाहोर येथील प्राणिसंग्रहालयातील वाघ, सिंह, मांजर असे प्राणी पाकिस्तानने विक्रीला काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची बिकट परिस्थिती जगासमोर यायला हळूहळू सुरूवात झाली आहे.
आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाकिस्तान सौदी अरेबिया, यूएई आणि चीन या प्रमुख मित्र राष्ट्रांशी चर्चा करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एप्रिलमध्ये सौदी अरेबियाला भेट दिली तेव्हा रियाधने त्यांना कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने ते रिकाम्या हाताने परतले. यूएईही पाकिस्तानच्या मदतीला येण्यास तयार नव्हते. कर्ज देण्याऐवजी यूएईने पाकिस्तानला शेअर्स आणि मालमत्ता खरेदी करण्याची ऑफर दिली.
साईबाबांचे दर्शन घेऊन मोठा नेता मुंबईला रवाना, आता लाल दिवा घेऊनच येणार?
पाकिस्तानच्या लष्कराने आर्थिक मदतीसाठी सौदी अरेबिया आणि यूएई या दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांशी बोलल्याचे समजते. दरम्यान, पाकिस्तानातील प्रचंड महागाई आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीचा परिणाम फक्त नागरिकांवरच नाहीतर प्राण्यांवरही होत असल्याचं समोर आलं आहे. लाहोर येथील प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्यांना खायला घालायला पैसे नसल्यामुळे तेथील सिंह विक्रीला काढले आहेत.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिवसेनेत, राष्ट्रवादीला मोठा धक्का..
तसेच इतर प्राणी देखील विक्रीला काढले आहेत. यामध्ये मोठे मांजर, सिंह आणि वाघांचाही लिलाव होणार आहे. खासगी संस्थांना हे प्राणि विकले जाणार असून त्यामुळे पैसा आणि जागा वाचेल असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यामुळे परिस्थिती किती बिकट असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता बिहारचा नंबर! उद्या बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होणार? जेडीयूने खासदार-आमदारांची बैठक..
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना नोटीस; राज्याच्या राजकारण खळबळ
काझडमध्ये मोफत बियाणे वाटप, पोषणयुक्त आहारासाठी सरकारचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा मोठा प्रयत्न
Share your comments