औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
यामध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नावं आहे.
दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. त्यांनी शेतातील राहत असलेल्या घरात रविवारी दुपारी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली.
दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. तसेच पीरबावडा येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेतले होते. तर, औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार मालामाल, सरकार 65% खर्च उचलणार
वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते.
Share your comments