1. बातम्या

कोरोना निर्बंधाचा विपरीत परिणाम पोल्ट्री व्यवसायावर, अंडी आणि चिकनच्या मागणीत घट

नववर्षाच्या सुरूवातीपासूनच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असूनदेशात बरेच ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत.या निर्बंधाचा विपरीत परिणाम हा घाऊक बाजारात असलेल्या चिकन आणि अंडी यांच्या किमतींवर व त्यांना पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात चिकन आणि अंड्यांच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
poultry

poultry

नववर्षाच्या सुरूवातीपासूनच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असूनदेशात बरेच ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत.या निर्बंधाचा विपरीत परिणाम हा घाऊक बाजारात असलेल्या चिकन आणि अंडी यांच्या किमतींवर व त्यांना पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात चिकन आणि अंड्यांच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

अंडी समन्वय समितीने जाहीर केलेल्या किमतीनुसार  नवीन वर्षात सलग अकराव्या दिवशी अंड्यांच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळत आहे. जर दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये पाचशे रुपयांना 100 अंडी तर हैदराबाद मध्ये 440 रुपयांना शंभर अंडी मिळत आहेत. भाऊ बाजारामध्ये चिकनचे दर घसरून 90 ते 120 रुपये किलो झाले आहे.

कोरोना संकटा सोबतच पोल्ट्री खाद्य दरातवाढ़

कोरोनामुळे प्रतिकूल परिस्थिती आली असताना दुसरीकडे पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर स्थिर असले तरी मक्‍याच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच वाहतुकीचा खर्च वाढल्याने मका ही दोन हजार रुपये क्विंटल पडत आहे.

कोंबडी आणि अंड्यांच्या दरात घसरण झाली असताना त्यांच्या खाद्याच्यादरात मात्र दुपटीने वाढ झाली आहे.

 अंडी समन्वय समितीचा अहवाल

 या समितीच्या अहवालानुसार सध्या मुंबई आणि उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अंड्यांची मागणी जास्त आहे. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी आणि लखनऊ या मोठ्या शहरांमध्ये पाचशे ते 30 रुपये शेकडा अंडीमिळत आहेत. 

तसेच उत्तर प्रदेश पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष नवाबअली यांनी सांगितले की, कुकुट पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. पूर्वी वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची प्रगती होत नव्हती आता कोरोना च्या महामारी मुळे शेतकऱ्यांची आणि व्यापार यांची चिंता वाढली आहे. धोरणाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा लवकर बंद होत असल्याने मागणीत घट होत आहे.(संदर्भ-tv9मराठी)

English Summary: bad impact of corona pandamic on poultry industries chicken and egg Published on: 12 January 2022, 05:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters