बाबासाहेब पारधे यांना क्रीडा संस्‍थेचा उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार

17 April 2019 08:10 AM


परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब पारधे यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत असलेल्‍या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेच्‍या (क्रीडा) वतीने 2019 वर्षाचा कोरडवाहु शेतीतील उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आला. 

केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेच्‍या स्‍थापना दिनीनिमित्‍त हैद्राबाद येथे सदरिल पुरस्‍कार संस्‍थेचे संचालक डॉ. जी. रविंद्र चारी व प्रा. जयशंकर तेलंगणा कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. प्रवीण राव यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. यावेळी वरीष्‍ठ संशोधन सहयोगी डॉ. हनुमान गरूड हे उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रम राबविण्‍यात येत असुन श्री. बाबासाहेब पारधे यांनी हवामान बदलानुरूप परिस्थितीत अनुकूल कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत शाश्‍वत उत्‍पादन मिळवित आहेत.

कोरडवाहू शेतीतील विविध तंत्रज्ञानाबाबत श्री बाबासाहेब पारधे यांना कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. मदन पेंडके यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani CRIDA Central Research Institute for Dryland Agriculture केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था Babasaheb Pardhe बाबासाहेब पारधे
English Summary: Babasaheb Pardhe is the Outstanding Farmer Award from CRIDA Hyderabad

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.