1. बातम्या

बाबासाहेब पारधे यांना क्रीडा संस्‍थेचा उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार

परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब पारधे यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत असलेल्‍या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेच्‍या (क्रीडा) वतीने 2019 वर्षाचा कोरडवाहु शेतीतील उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आला.

KJ Staff

केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेच्‍या स्‍थापना दिनीनिमित्‍त हैद्राबाद येथे सदरिल पुरस्‍कार संस्‍थेचे संचालक डॉ. जी. रविंद्र चारी व प्रा. जयशंकर तेलंगणा कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. प्रवीण राव यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. यावेळी वरीष्‍ठ संशोधन सहयोगी डॉ. हनुमान गरूड हे उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रम राबविण्‍यात येत असुन श्री. बाबासाहेब पारधे यांनी हवामान बदलानुरूप परिस्थितीत अनुकूल कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत शाश्‍वत उत्‍पादन मिळवित आहेत.

कोरडवाहू शेतीतील विविध तंत्रज्ञानाबाबत श्री बाबासाहेब पारधे यांना कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. मदन पेंडके यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

English Summary: Babasaheb Pardhe is the Outstanding Farmer Award from CRIDA Hyderabad Published on: 17 April 2019, 08:12 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters