1. बातम्या

अजब महावितरणचा गजब कारभार!! आठ वर्षांनंतरही वीज जोडणी नाही, तरी 1 लाखांचे आले वीज बिल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजतोडणीचा प्रश्न पेटला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. सध्या महावितरण वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. आता या महावितरण (Maharashtra State Electricity) कंपनीचा एक नवा कारभार समोर आला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
MSEDCL

MSEDCL

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजतोडणीचा प्रश्न पेटला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. सध्या महावितरण वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. आता या महावितरण (Maharashtra State Electricity) कंपनीचा एक नवा कारभार समोर आला आहे. हिंगोलीतील (Hingoli) सेनगाव येथील शेतकरी कुंडलिक तिडके यांनी 2004 मध्ये वीज जोडणीची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कुंडलिक तिडके यांना वीज (Electricity) जोडणी मिळाली नाही.

असे असताना आता याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. याचे शेतकऱ्याला 1 लाख 11 हजाराचे बिल यांच्या नावाने देण्यात आले आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुंडलिक तिडके यांना एक हेक्टर शेत जमीन आहे. ही शेतजमीन सेनगावच्या शेतशिवारात आहे. ही शेती ओलिताखाली आणण्यासाठी कुंडलिक तिडके यांनी आपल्या शेतामध्ये एक बोरवेल घेतले होते. 2014 साली तिडके यांनी महावितरणचे कोटेशन भरून वीज जोडणीची मागणी केली होती.

असे असताना गेल्या आठ वर्षांपासून महावितरणच्या वीज जोडणीची वाट पाहत आहेत. या आठ वर्षांत महावितरणने कुंडलिक तिडके यांच्या शेतात वीजजोडणी दिलीच नाही. परंतु कुंडलिक तिडके यांना एक लाख अकरा हजार रुपयाचा वीज बिल महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे कसलीही वीज न वापरता हे बिल आलेच कसे अशा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

आपल्या शेतात वीज जोडणी महावितरणने दिलीच नाही, मग एक लाख अकरा हजार रुपये वीज बिल भरायचे कशाचे? आसा प्रश्न कुंडलिक तिडके यांना पडला आहे. यामुळे आता महावितरणचा ढिसाळ नियोजनाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. तसेच अनेक वीज ग्राहकांना महावितरणच्या वतीने वाढीव बिल दिली जातात. असे प्रकार करुन वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा काम ही महावितरण कंपनी करत आहे. यामुळे आता याची चर्चा रंगली आहे.

English Summary: Awesome management of MSEDCL !! Even after eight years, there is no electricity connection, but the electricity bill is 1 lakh Published on: 06 March 2022, 04:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters