1. बातम्या

बलदंड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'कांताई' पुरस्कार प्रदान

KJ Staff
KJ Staff
जैन हिल्स येथील आकाश मैदानावर पार पडलेल्या 'स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कारा' ने सन्मानित भुमिपूत्र सपत्निक. सोबत कविवर्य ना. धों. महानोर, अशोक जैन, ज्योती जैन, अजित जैन, शोभना जैन, अभय जैन, एस. व्ही. पाटील, सुनील देशपांडे, गौतम देसर्डा, डॉ. अनिल ढाके, सुनील गुप्ता, के. बी. पाटील, डॉ. बालकृष्ण यादव व मान्यवर.

जैन हिल्स येथील आकाश मैदानावर पार पडलेल्या 'स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कारा' ने सन्मानित भुमिपूत्र सपत्निक. सोबत कविवर्य ना. धों. महानोर, अशोक जैन, ज्योती जैन, अजित जैन, शोभना जैन, अभय जैन, एस. व्ही. पाटील, सुनील देशपांडे, गौतम देसर्डा, डॉ. अनिल ढाके, सुनील गुप्ता, के. बी. पाटील, डॉ. बालकृष्ण यादव व मान्यवर.

जळगाव: कंपनीचे शेती, शेतकरी, पाणी यांच्याशी अतूट नाते असून करार शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचले आहे. या तंत्रज्ञानाचा वापरासह, अनुभवाच्या आधारे आर्थिकसुबत्ता आणणारे आणि सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या 14 भूमिपुत्रांचा सपत्नीक 'स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ देऊन गौरव होणे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पुढील वर्षापासुन हा पुरस्कार तीन शेतकऱ्यांना दरवर्षी दिला जाईल आणि पुरस्काराची रक्कम वाढविली जाईल असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. दरम्यान श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या व्यक्तीमत्वानुसार पुरस्कारार्थींचे कार्य बलदंड आहे असा गौरव कविवर्य ना. धों. महानोर यांनी केला.

कराराची शेती व सूक्ष्मसिंचनासह आधुनिक कृषी उच्च तंत्रांचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतींद्वारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादन घेणाऱ्या भुमीपूत्रांचा आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा 'स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कविवर्य ना. धों. महानोर, ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजीत जैन, शोभना जैन, विपणन प्रमुख अभय जैन, एस. व्ही. पाटील, जैन फार्मफ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, सुनील गुप्ता, के. बी. पाटील, गौतम देसर्डा, डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव यांच्यासह सन्मानित करण्यात येणारे 14 भुमिपूत्र सपत्नीक उपस्थीत होते.

करार शेती, प्रक्रिया उद्योग, कंपनीची सद्यस्थिती व पुढील दिशा याबाबत भुमिपूत्रांशी संवाद साधताना अशोक जैन म्हणाले की, सध्या करार शेतीला भविष्यात खूप मोठी संधी आहे. कंपनीने नव्याने उभारलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगाला मिरची, आले, हळद, जिरे, धने यांची मोठ्याप्रमाणावर आवश्यकता आहे. शिवाय फळे, भाजीपाला यासह पेरू, टोमॅटो, केळी यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये टोमॅटो व पेरू नाशिक, शिर्डी, राहता येथून मागिविला जातो, त्यासाठी दळणवळणावर मोठा खर्च होतो. हे उत्पादन पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पुरविले तर तो खर्च कमी होऊन भूमिपुत्रांना त्याचा अतिरिक्त फायदा देता येईल. 1995 ला शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू झाला. यात पांढरा कांदा करार शेतीत 2001-2002 मध्ये 473 शेतकरी सहभागी झाले. यावेळी 2,600 टन कांदा उत्पादन मिळाले. आज याचे स्वरूप वाढून जेव्ही-12 व जेव्ही 5 मिळून हजारो शेतकरी जुळले आहेत. गुणवत्ता, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचा विश्वास यावर करार शेतीचे आदर्श मॉडेल भारतात ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांना थारा न देता भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून कंपनीला आपले उत्पादन पुरवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आपण बलदंड शेतकरी: ना. धों. महानोर

श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन व ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला त्या स्वसौकांताई यांची आठवण काढत ना. धों. महानोर म्हणाले की, शेतीचे अर्थशास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करावे. शेतीशी संवाद साधा. ती आपल्याला समृद्ध करते. कृतज्ञतापूर्वक काळ्या आईची सेवा केली तर ती विश्वाचे पोट भरते. मी शेतीवर कविता केल्या त्यामुळे जगभर पोहचलो. याच धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनात्मक पिकपद्धती वापरून सक्षम व्हावे असे आवाहन करून पीकपद्धतीत फेरपालट करण्याचा सल्लाही कविवर्य महानोर यांनी दिला. काही वेळा जीवनात संघर्षाचा काळ येतो. चंद्र, सूर्यालासुद्धा ग्रहण लागते आपण तर मानव आहोत. आपल्याला संघर्ष अटळ आहे. मात्र आपण बलदंड शेतकरी असल्याने त्यावर मात करू शकतो असाही विश्वास त्यांनी जागविला.

जैतपूर येथील आदिवासी शेतकरी बांधवांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा तीरकमान देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान केलाआरंभी प्रास्ताविक गौतम देसर्डा यांनी केले. त्यात त्यांनी करार शेतीची प्रगती व पुरस्कार निवडीबाबत सांगितले. के. बी. पाटील यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी याबद्दल मार्गदर्शन केले. हेमचंद्र पाटील, काशिनाथ पाटील, रविंद्र महाजन यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन व कांताई यांच्याविषयी विचार प्रकट केले. डॉ. अनिल ढाके यांनी आभार मानले. खंडवा येथील लक्ष्मीनारायण मांगीलाल सामडिया यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदनासह समारोपाचे राष्ट्रगीत गायन केले.

स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने सन्मानित शेतकरी

जैन तंत्रज्ञानासह करार शेतीतुन पांढरा कांदाचे उत्पादन घेऊन समृद्धी आणणाऱ्या 14 भुमिपूत्रांचा सपत्नीक स्वसौकांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आलायामध्ये भाऊसाहेब काशिनाथ शेलार (ऐंचाळे जिधुळे), सुभाष प्रभाकर देसाई (चोपडा जिजळगाव), प्रविण झुलाल पाटील (खर्डी जिजळगाव), साहेबराव हिलालसिंग इंगळे (वर्णा जिबुलढाणा), राजेंद्र सुधाकर चौधरीरविंद्र शामराव महाजनमोहन लक्ष्मण महाजनदेवेंद्र रामदास चौधरी (सर्व अहिरवाडीजिजळगाव), प्रमोद पुंडलीक पाटील (तऱ्हाड जिधुळे), नरसई सजन पाटील (दामडदा जिनंदुरबार), ज्ञानेश्वर भाऊराव पाटील (विखरणजिधुळे), शरद तुळशीराम चौधरी (नशिराबाद जिजळगाव), दिपक दत्तू महाजन (कर्जोद जिजळगावयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलायात नशिराबाद येथील गणेश ज्ञानेश्वर पाटील यांनी वडिलांच्या वतीने पुरस्कार स्विकारला.

दरवर्षी पहिल्या तीन शेतकऱ्यांना पुरस्कार

पुरस्काराविषयी अशोक जैन म्हणाले की, 2001 पासुन हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यावेळी 11 हजार रूपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सौभाग्य वतीसाठी सौभाग्य सन्मान असे स्वरूप होते. 2005 पासून यात 21 हजार रूपये अशी वाढ करण्यात आली. पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये हा पुरस्कार प्रदान होईल. मात्र त्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रत्येकी, 31, 21, 11 हजार रूपये सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, सौभाग्य सन्मान असे स्वरूप राहिल.

वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रमध्यप्रदेशगुजरातमधील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सपत्नीक निमंत्रण.
  • तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांची कुटुंबासह उपस्थिती.
  • भव्य दोन एलईडी स्क्रीनवर कार्यक्रमाचे प्रक्षेपण.
  • 56 हून भाजीपालारानभाज्यावनऔषधी यांच्यासह कृषी साहित्याचे प्रदर्शन.
  • जैन फार्मफ्रेशच्या उत्पादनांची श्रृखंला सवलतीत.
  • गांधी तीर्थभाऊंची सृष्टीमसाला प्रकल्पजैन हायटेक संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रास शेतकऱ्यांची भेट.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters