देशातील प्रसिद्ध कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा, बायर आणि टॅफेयांना कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन वापरायला परवानगी देण्यात आली आहे.ही परवानगी नागरी उड्डाण मंत्रालय द्वारा दिली गेली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर या कंपन्या कृषी मध्ये ड्रोनचा वापर करू शकतील.
या कंपन्यांना ही परवानगी काही अटी ठेवून दिली गेली आहे. ज्या या कंपन्यांना पूर्ण करावे लागतील.नागरी उड्डाण मंत्रालयाने मागच्या हप्त्यात महिंद्रा अँड महिंद्रा, टॅफेआणि बायर क्रॉप सायन्स सोबत विविध प्रकारच्या संस्थांना वेगवेगळ्या उद्देशांसाठी ड्रोन वापराची सशर्त परवानगी दिली आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की महिंद्रा अँड महिंद्रा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ड्रोन आधारित कृषी परीक्षण तसेच धान आणि मिरची या पिकांवर फवारणी साठी ड्रोनचा वापर करणार आहे.
यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला परवानगी देण्यात आले आहे. तसेच बायर क्रॉप सायन्स ही कंपनी ड्रोन वर आधारित करण्यात येणाऱ्या कृषी अनुसंधान गतिविधि साठी ड्रोन चा वापर करणार आहे तसेच कृषी मध्ये फवारणी करण्यासाठी या कंपनीला ड्रोनवापरास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टर्स अंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड (टॅफे ) या कंपनीला पिकांवर पडणारे रोग आणि त्यादृष्टीने उपाययोजना आदींचे आकलन व्हावे तसेच ड्रोनवर आधारित हवाई फवारणी साठी ड्रोन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतीत मंत्रालयाने सांगितले की वरील सर्व कंपन्यांना मानवरहित विमान प्रणाली नियम 2021 पासून सशर्त सूट दिली आहे. ही दिली गेलेली मंजुरी तारखेपासून एक वर्षापर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंतवैध राहील.नागरी उड्डाण मंत्रालयाने नवीन ड्रोन नियम 2021 पारित केला आहे. जो मानवरहित विमान प्रणाली नियम 2021 ची जागा घेईल. सरकारने याबाबतीत अधिसूचना जारी केले आहे की सरकारने 15 जुलै या दिवशी नवीनड्रोन नियमांची घोषणा केली होती आणि पाच ऑगस्टपर्यंत त्यावर सूचना मागवले होते.
सरकारने आपल्या ड्रोननीतीमध्ये काही आमूलाग्र बदल केले आहेत. या बदलामुळे लोकांना होणारा त्रास दूर होणार आहे. सरकार नेनवीन नियमांच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी दूर केले आहेत. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ड्रोनच्या बाबतीत असलेली ही नीती देवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फायदेशीर ठरणार नाही तर कृषी, खाणकाम इत्यादी क्षेत्रांमध्ये सुद्धा फायदेशीरठरणारआहे.यांनी की द्वारे सरकारची नियोजन आहे की 2030 पर्यंत देशाला ड्रोन हबच्या रूपात विकसित करणे हे होय.
Share your comments