गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकदा अचानक हवामान बदलत आहे. कधी अचानक जोरदार पाऊस तर कधी थंडी पडत आहे. असे असताना राज्यामध्ये शासन 'स्कायमेट'च्या (Skymet) महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती (Weather Information) घेते.
सध्याचे वेगवेगळ्या भागातील बदलते वातावरण (Changing Climate)आणि पावसाची परिस्थिती पाहता अजून हवामान केंद्राची गरज आहे. यामुळे आता सरकारने दहा हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे निश्चित केले आहे.
यामुळे याचा फायदा होणार आहे. याबाबत मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
युट्यूबवर व्हिडिओ पाहून शेतकऱ्याने केली खेकडा पालनाला सुरुवात, आता कमवतोय ६ लाख
यामध्ये पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, यायची दिशा. वाऱ्याचा वेग आदी प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहिती उपलब्ध करून पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, या विविध उपक्रमांची माहिती होणार आहे.
औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
राज्यातील २९००० ग्रामपंचायतींपैकी दहा हजार ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. लवकरच याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
गुजरातमध्ये उसाला 4700 भाव, मग महाराष्ट्रात 2900 एफआरपी का?
वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
शेणाचं केलं सोनं! शेणाच्या उत्पादनांमधून करोडोंची कमाई...
Share your comments