उद्यापासून अटल पेन्शन योजनेमध्ये होणार बदल

30 June 2020 05:51 PM By: भरत भास्कर जाधव

जर आपण अटल पेन्शनधारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. एक जुलै म्हणजेच उद्यापासून सरकार या योजनेत बदल करू इच्छित आहे. उद्यापासून अटल पेन्शन योजनेतील खात्यांमधून मासिक योगदान आपोआप कापले जाणार आहे. पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाने बँकांना अटल पेन्शन योजनेच्या ऑटो डेबिट ३० जूनपर्यंत थांबविण्याचे निर्देश दिले होते. आता परत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे एप्रिल महिन्यात ऑटो डेबिट करण्याचा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी हे मध्यम आणि सामान्य गटातील आहेत. मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाच्या वेळी नागरिकांच्या हाती पैसा राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

पीएफआरडीएच्या अलीकडील अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की जर ग्राहकांच्या पेन्शन योजनेचे खाते ३० सप्टेंबर २०२० पूर्वी नियमित केले असेल तर त्या लाभार्थ्यांना व्याजावरील दंड आकराला जाणार नाही.  बऱ्याच वेळेस जर हप्त्यासाठी उशिर झाला तर बँक दंड वसूल करत असते.  अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, १०० रुपये प्रति महिन्यापर्यंत १ रुपये प्रति महिना दंड आकरला जातो.

यासह १०१ रुपये आणि ५०० रुपये दरम्यान दोन रुपये प्रति महिना दंड असतो. ५०१ रुपये आणि १००० रुपयांच्या दरम्यान पाच रुपये प्रति महिना दंड असतो. तर १००१ रुपयांच्या पलीकडील हप्त्यासाठी  १० रुपये प्रति महिना दंड असतो.  दरम्यान  अटल पेन्शन योजनेची सुरुवात ही सामान्य जनतेच्या हितासाठी सुरु केली होती. या योजनेतून त्यांना भविष्यात आर्थिक साहाय्यता मिळेल या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली होती. यात १८ ते ४० वयातील भारतीय नागरिक योगदान करु शकतो, म्हणजेच या  योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Atal pension scheme Pension scheme money atal pension scheme auto debt अटल पेन्शन योजना पेन्शन योजनेचा पैसा पेन्शनचा हप्ता अटल पेन्शन योजनेचा हप्ता
English Summary: Atal Pension Scheme start auto debit services from 1 July

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.