अटल भूजल योजना : भूजल पातळी वाढविण्यासाठी सरकार खर्चणार ९२५ कोटी

16 October 2020 02:04 PM By: भरत भास्कर जाधव


भूजलाचा होत असलेला भरमसाठ उपशामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस घसरण होत आहे व त्याची गुणवत्ताही खालावते आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी व घसरलेली गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात केंद्र सरकारची अटल भूजल योजना राज्यात राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवण्यात येत आहे. घसरणाऱ्या भूजल पातळीला आळा घालण्यात येणार आहे. जलसंधारण व कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचनाच्या उपाय योजनाद्वारे भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि पातळीत सुधारणा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनासाठी केंद्रशासन व जागतिक बँकेकडून ९२५.७७ कोटी एवढे अनुदान पुढील पाच वर्षांमध्ये उपलब्ध होणार आहे. या एकूण रकमेतून १८८.२६ कोटी रुपये संस्थात्मक बळकटीकरणासाठी व क्षमता बांधणीसाठी आहेत. तर उरलेले ७३६.५१ कोटी विविध विभागामार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या पुर्तते अंती प्रोत्साहन अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. महाराष्ट्रातील अति शोषित, शोषित आणि अंशतः शोषित याप्रमाणे विभागणी करून पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य देऊन ७३ पाणलोट क्षेत्रातील १४४३ गावांमधून सदर प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

ही योजना राबवण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्याच्या पातळीवर संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  संबंधित विभागांकडून पूर्ण होणाऱ्या कामांच्या पूर्ततेनंतर केंद्र शासनाकडून प्रोत्साहन अनुदान प्राप्त होईल. तसेच पाच वर्षांकरिता योजनेत समाविष्ट विभागांसाठी एकूण आवश्यकतेप्रमाणे ३६८.६३ कोटींची तरतूद राज्य शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे.

Atal Ground water Scheme state government अटल भूजल योजना केंद्र सरकार महाराष्ट्र शासन
English Summary: Atal Ground water Scheme - state Government will spend Rs 925 cr.16

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.