शेतकरी आणि त्याच्या दावणीला बांधलेल्या मुक्या जनावरांचे नाते हे पिता-पुत्र प्रमाणेच असते. दावणीला जर दुभते जनावर असलं तर बळीराजा त्यांची विशेष काळजी घेत असतो. दुभत्या जनावराच्या खुराकसाठी दिवस-रात्र वणवण करत असतो. एकंदरीत दावणीला बांधलेले जनावर शेतकऱ्यांसाठी एक परिवाराचा सदस्य असतो याचीच प्रचिती देणारे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते माढा तालुक्यातुन.
येथील एका शेतकऱ्याच्या गाईने दोन वासरांना एकाच वेळी जन्म दिला त्यामुळे या शेतकरी परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माढ्यातील गणेश साळुंखे नामक शेतकरी यांच्या गाईने दोन वासरांना जन्म दिला त्यामुळे आनंदित साळुंखे परिवाराने आपला आनंद गावकरीसमवेत साजरा करण्यासाठी पेढे वाटलेत. एकाच वेळी दोन वासरांना गाईने जन्म दिल्यामुळे परिसरात या विषयी मोठी चर्चा रंगली आहे. कारण की क्वचितच वेळी गाई दोन वासरांना जन्म देत असतात.
गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना याची जाणीव असल्याने त्यांनी हा आनंदाचा क्षण जल्लोषात साजरा केला. माढ्यासह आजूबाजूचे पशुपालक शेतकरी याला चमत्काराची उपमा देत असून गणेश व त्यांच्या गाईचे मोठे कौतुक करीत आहेत.
गाईने दोन गोंडस वासरांना जन्म दिल्यामुळे परिसरात याविषयी मोठे कुतुहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गाईने जन्म दिलेल्या दोन्ही वासरांची प्रकृती खुपच चांगली आहे. सोलापूर मार्गावर ग्रीन सिटी पार्क जवळ गणेश साळुंखे या पशुपालक शेतकऱ्यांची शेती आहे. गणेश व त्यांच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. त्यांच्या या आनंदात पंचक्रोशीतील इतर पशुपालक शेतकरी देखील समाविष्ट झालेत. या वेळी लोकांनी गणेशचे देखील मोठे कौतुक केले.
गणेश या पशुपालक शेतकऱ्याने 5 वर्षांपूर्वी ही गाय खरेदी केली होती तेव्हापासून गणेश यांनी या गाईची विशेष काळजी घेतली असून तिची मनोभावे सेवा केली आणि आज या गाईने सुखरूप दोन वासरांना जन्म दिला. पाच वर्षांपूर्वी गणेश यांनी ही गाय मात्र बारा हजार रुपयाला खरेदी करून आणली होती. गणेश यांनी शेतकरी आणि त्याच्या दावणीला बांधलेले जनावरे यांचे अनमोल नाते रेखांकित केले असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. सोशल मीडियावर देखील गणेश व त्यांच्या गाईचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.
Share your comments