मागील अनेक दिवसांपासून शेत करी ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो दिवस आज उजडला असून नववर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १० हप्ता जमा झालेले आहे. मागील वर्षी हा हप्ता २५ डिंसेबर रोजी जमा झाला होता. मात्र वर्षाच्या सुरुवातीस देशातील शेतकरी वर्गास हे गिफ्ट देण्याचे मोदींनी ठरविले होते त्यामुळे हा हप्ता जमा होण्यास थोडा उशीर लागला मात्र सुरुवातीस शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील १ कोटी ५ लाख शेतकरी घेणार या योजनेचा लाभ:-
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील ११ कोटी पेक्षा जास्त शेतकरी घेत आहेत जे की मागील काही महिन्यांपूर्वी यामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या असल्याने कर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून सुद्धा रक्कम परत घेतली गेली होती. याया योजनेचा लाभ महाराष्ट्रातील १ कोटी ५ लाख शेतकरी घेत आहेत. कृषी आयुक्त धीरज कुमार सांगतात की या योजनेच्या अनुषंगाने २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता घेण्यासाठी बँकेमध्ये गर्दी होऊ नये म्हणून नियमांचे पालन करावे असे कृषी विभागाच्या वतीने सांगितले आहे.
सेंद्रिय शेती नंतर आता काय संदेश?
मागील काही दिवसांपूर्वी गुजरात येथे पार पडलेल्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता त्यावेळी सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविणे याबद्धल बोलणे झाले होते. त्यावेळी जवळपास ८ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतले असल्याचे कृषी मंत्रालयाने सांगितले आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा तर झालाच आहे तसेच शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. गावपातळीवरील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे म्हणून http://pmindiawebcast.nic.in/ ही लिंक उबलब्ध करून दिली आहे.
eKYC केल्यावरच मिळणार का निधी?
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी जमा होण्यास २ दिवसाचा कालावधी लागतो मात्र अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की eKYC प्रक्रिया केल्यावरच निधी जमा होणार आणि नाही केली तर काय होणार. eKYC जरी नाही केली तरी सुद्धा तुमच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे परंतु मार्च २०२२ नंतर चे जर हप्ते मिळवायचे असतील तर eKYC करून घेणे गरजेचे आहे. eKYC साठी फक्त १५ रुपये आकारले जातील.
Share your comments