शेती क्षेत्रामध्ये आता बऱ्याच गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. राज्यातील महसूल विभागाने संगणीकृत सातबारा,ई पीक पाहणी,ऑनलाइन फेरफार, जमिनीच्या मोजणी कामी जलदताअसे अनेक आधुनिक उपक्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने हाती घेतले आहेत.
.याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना संगणीकृत सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. हा नवीन सातबारा शेतकऱ्यांना समजणार सहज आणि सोपा आहे. या नवीन सातबाराचे स्वरूप शेतकऱ्यांना समजावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. या खाते उतारा ची पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे.
यासाठी येत्या 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीपासून महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहेत. या उपक्रमाची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
यावेळी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांना आवश्यक सेवा सहज आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही खाते उतारा सहज आणि सोपा सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दहा नवीन स्वरूपातील सातबारा थेट शेतकऱ्यांच्या आणि खातेदारांच्या हातात घेऊन आम्ही सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत. तसेच बोलताना पुढे म्हणाले की पुढील येणाऱ्या काळामध्ये फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे महसूल यंत्रणेला स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत.
Share your comments