लातूर: केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना (Farmers) शेतीसाठी आर्थिक हातभार लागावा यासाठी वर्षाला ६००० हजार रुपये २००० हजार रुपयांच्या हफ्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आता १२ व्या हफ्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
मात्र १२ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याअगोदर केंद्र सरकारने ई- केवायसी (e- Kyc) करणे बंधनकारक केले आहे. ई- केवायसी करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदत वाढवून दिली आहे. तसेच आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांनी ई- केवायसी केलेली नाही.
ई- केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात १२ वा हफ्ता वर्ग करण्यात येणार नसल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आता लातूरमधून (Latur) धक्कादायक माहिती समोर येत आहे. ई- केवायसी ची मुदत संपत आली असली तरीही लातूरमध्ये १ लाख शेतकरी ई- केवायसीविनाच असल्याचे समोर आहे आहे.
लातूर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ३ लाख १४ हजार ५८८ इतकी आहे. यामधील १ लाख ९६ हजार ८१६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. तर १ लाख १७ हजार ७२२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.
केंद्र सरकारच्या आदेशनानंतर ग्राहक सेवा केंद्रामध्ये बायोमेट्रिक पद्धतीने ई- केवायसी (Biometric e-KYC) करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई- केवायसी पूर्ण होणार नाही अशा शेतकऱ्यांना १२ वा हफ्ता मिळणार नाही. त्यामुळे ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
PM Kisan: सावधान! पीएम किसान लाभार्थ्यांनो या चुकीमुळे मिळणार नाही १२ वा हफ्ता...
ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ई- केवायसी करू शकतात. ई- केवायसी करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी इ केवायसी प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
भाजीपाल्याचे दर कडाडले! आवक घटल्याने दरात वाढ
ऊस शेतीच्या तुलनेत 40 पट अधिक नफा! स्टीव्हिया औषधी वनस्पतीची लागवड करा आणि ५ वर्षे भरघोस नफा मिळवा...
Share your comments