आतापर्यंत गाय आणि म्हशी मध्ये कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा केली जात होती. परंतु आता बकरीचे सुद्धा कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा केली जाईल.काही दिवसांअगोदर केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म मध्ये एआय टेक्नॉलॉजी चा प्रयोग बकरी वर केला गेला व त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.
एक चांगल्या प्रजातीच्या बोकड पासून कमीत कमी शंभर बकऱ्यांचे गर्भधारणा केली जाऊ शकते व त्याद्वारे चांगल्या जातीची पैदास करता येऊ शकते. आतापर्यंत ज्या बकरी आणि बोकड यांचे पैदास कृत्रिम रेतनाद्वारे केली केली आहे, त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. दूध देण्याचे प्रमाणही चांगले आहे आणि वजनही चांगले आहे. कृत्रिम रेतनाचा फायदा असा होईल की चांगला प्रजाती आणि चांगल्या वजनाची बकऱ्या आणि बोकड यांची पैदास केली जाईल व त्याद्वारे मांसउत्पादनही जास्त होईल. शेळी पालन व्यवसाय आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व्यवसाय आहे.या तंत्रज्ञानाद्वारे शेळीपालन हा एक चांगला उत्पन्नाचा व्यवसाय होऊ शकतो.
सामान्य बकरी आणि कृत्रिम रेतनाद्वारे निर्मित बकरी मधील फरक
केंद्रीय मेंढी प्रजनन फार्ममध्ये 50 बकरी मोर ट्रायल स्वरूपात ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. यामध्ये दिसून आले की या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जन्मलेल्या बकऱ्या आरोग्यदृष्ट्या मजबूत आहेत. सामान्य बकरी एका दिवसात 800 ग्राम दूध देते तर ए आय तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित बकरी दीड लिटर दूध प्रति दिन देते.
तसेच सामान्य बकरी चे पिलाचे वजन हे दीड किलोपर्यंत असते.तरतंत्रज्ञानाद्वारे उत्पन्न झालेल्या बकरीच्या पिलाचे वजन तीन किलोपर्यंत असते.
केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म चे निर्देशक डॉ. ए.क. मलोत्रा त्यांनी सांगितले की, त्यांनी एक वर्ष अगोदर कृत्रिम रेतनाचा प्रयोग बकऱ्यानं वर केला होता.त्यामागे उद्देश होता की चांगल्या जातींच्या बकरी उत्पादनाचा दृष्टीने कार्य केले जावे. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळाले.
Share your comments