सध्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांनी उस्मानाबादमधील परांड्यात येऊन ही कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून हा आरोपी फरार झाला होता. त्याच्याकडून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. जादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष देऊन शेकडो शेतकऱ्यांचे 3 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून आरोपी संतोष रानमोडे फरार झाला होता.
संतोष रानमोडे हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील मूळ रहिवासी आहे. या आरोपीने उकिरड्यात पुरुन ठेवलेली 42 लाख 11 हजार 920 इतकी रोकड जप्त केली आहे. त्याच्याकडून रकमेसह एक कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. संतोष रानमोडे याचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पवित्रा ट्रेडिंग कंपनी नावाचे धान्य खरेदी आडत दुकान होते. संतोषने अशोक म्हस्के, निलेश सावळे यांच्या मदतीने चिखली परिसरातील शेतकऱ्यांना जादा दराने धान्य खरेदी करण्याचे अमिष देऊन शेतकऱ्याकडून, हरभरा, सोयाबीन असा शेकडो क्विंटल शेतमाल खरेदी केला आणि बँक खात्यावर पैसे देतो असे सांगितले.
असे असताना पैसे न देता घेतलेला माल विकून तिघे आरोपी फरार झाले. फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली. यातील आरोपींविरुद्ध चिखली पोलिसात 161 शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस यानंतर आरोपीच्या मागावर होते. यानंतर पोलिसांनी 14 जुलै रोजी परंडा तालुक्यातील बावची येथून मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास अटक केली.
बिग ब्रेकिंग! ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा, शिक्षण क्षेत्रात खळबळ
यावेळी रानमोडेची चौकशी केली. त्यानंतर उकिरड्यात पुरुन ठेवलेले 42 लाख 11 हजार 920 रुपयाची रोकड आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. यामुळे आता या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील, दरम्यान अनेक शेतकऱ्यांची अशीच फसवणूक केली जात आहे. यामुळे आपला माल विकताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
अवघडच झालं! पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, मतदारांकडून पुन्हा केली ४ लाखाची वसुली
video: गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा, दोरीने बांधल्यामुळे फरफटत नेल, आणि...
याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड
Share your comments