काल राज्यातील राजकारण मोठी घडामोड घडली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली.
दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगितले गेले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली, यामुळे आता शिवसेना आक्रमक झाली आहे.
तसेच आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत. ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी दिली. यामुळे आता ईडीविरोधात शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत हे भाजपवर निशाणा साधत होते.
शेतकऱ्यांनो जनावरांची काळजी घ्या! 4 दिवसात 30 जनावरांचा मृत्यू
तसेच मोदींवर देखील त्यांनी टीका केली, यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही घोटाळ्याची संबंध नाही. मी झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही. मरेन, पण शरण जाणार नाही. खोटे आरोप, खोटी कागदपत्रे दाखवून कारवाई केली जात आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
लाखोंचा पोशिंदा अडचणीत, नियम बाजूला ठेवून मदत करा, आता करायचे काय अजितदादांनी दिला सल्ला
राज्यातील बड्या राजकीय नेत्यांना धक्का, साखर आयुक्तांनी पैसे थकवल्याप्रकरणी दिल्या नोटीस..
शेतकऱ्यांनो गाजर गवताचा करा कायमचा नायनाट, जाणून घ्या सोप्पी पद्धत..
Share your comments