1. बातम्या

एआरआय-516 संकरित द्राक्ष वाण विकसीत

नवी दिल्ली: देशभरात उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पुण्याच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने (डीएसटी) अधिक रसदार द्राक्षांचे उत्पादन विकसित केले आहे. डीएसटीच्या स्वायत्त अशा आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) शास्त्रज्ञांनी ही द्राक्षाची संकरित जात विकसित केली आहे. जी बुरशीजन्य संसर्गाला प्रतिबंध करणारी, झुपकेदार आणि उत्तम रसाचा दर्जा असणारी आहे. याचा उपयोग पेय, मनुका, जॅम, रेड वाइन करण्यासाठी करता येणार असून, शेतकरी उत्साहाने या प्रकाराचा अंगिकार करीत आहेत.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
 देशभरात उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पुण्याच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने (डीएसटी) अधिक रसदार द्राक्षांचे उत्पादन विकसित केले आहे. डीएसटीच्या स्वायत्त अशा आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) शास्त्रज्ञांनी ही द्राक्षाची संकरित जात विकसित केली आहे. जी बुरशीजन्य संसर्गाला प्रतिबंध करणारी, झुपकेदार आणि उत्तम रसाचा दर्जा असणारी आहे. याचा उपयोग पेय, मनुका, जॅम, रेड वाइन करण्यासाठी करता येणार असून, शेतकरी उत्साहाने या प्रकाराचा अंगिकार करीत आहेत.

डॉ. सुजाता टेटली, शास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि रोप संकरित गट एसएसीएस-एआरआय, यांनी आवश्यक गुणधर्मांवर काम करून ही द्राक्षाची विशिष्ट एआरआय-516 ही प्रजाती विकसित केली आहे. एआरआय-516 हा बुरशीजन्य संसर्गरोधक हा गुण अमेरिकन जातीचे द्राक्ष असलेल्या काटवा पासून उत्पन्न झाला आहे. यामध्ये उत्तम दर्जाची फलन क्षमता आणि प्रति युनिट उत्पन्न क्षमता आहे. ही संकरित जात लवकर पिकविण्यासाठी मळणीनंतर 110-120 दिवस लागतात. या जातीमध्ये द्राक्षाचे लांबलचक गुच्छ आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये आढळतात.  

द्राक्ष उत्पादनामध्ये भरताचा जगात बारावा क्रमांक लागतो. साधारणपणे 78% द्राक्ष उत्पादन हे उपयोगात आणले जाते, 17-20% हे मनुका उत्पादनासाठी, 1.5% वाईनसाठी आणि 0.5%  ज्यूस निर्मितीसाठी वापरले जातो. भारतात महाराष्ट्र हा द्राक्ष उत्पादनावर अग्रेसर आहे, जो 81.22% उत्पादन करतो. फार कमी प्रमाण ज्यूससाठी वापरले जाते. महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी सीडलेस (बी नसलेल्या) द्राक्षाची लागवड करतो. ज्याचा उपयोग मनुका तयार करण्यासाठी अधिक होतो. या जाती बुरशीजन्य संसर्गरोगावर अत्यंत संवेदनशील प्रभाव करतात. यामुळे वनस्पती संरक्षण खर्च वाढतो. कापणीनंतरच्या द्राक्षात 8.23-16 टक्के नुकसान होते. काढणीनंतरचा तोटा कमी करण्यासाठी ज्यूस तयार करणे हा एक चांगला पर्याय आहे.

एआरआय-516 ही संकरित जात व्हिटिस लाब्रुस्का जातीचा एक प्रकार काटवा आणि दुसरा ब्युटी सीडलेस या दोन प्रजातींच्या एकत्रीकरणातून तयार करण्यात आली आहे. द्राक्ष निर्मिती आणि प्रक्रिया हे महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन सायन्स (एसएसीएस) आणि एआरसीआय आणि शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांच्या सहयोगातून होत आहे.

English Summary: ARI-516 hybrid grape varieties developed Published on: 13 March 2020, 08:11 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters