आता सर्वजण पैसे काढण्यासाठी एटीएमचा उपयोग करत असतात. बँकेत रांग न लावता त्वरीत पैसे काढण्याचे आणि पैसे टाकण्याचे काम एटीएममार्फत केले जाते. अनेक शेतकऱ्यांकडे आता एटीएम कार्ड आहे, एटीएम कार्डच्या माध्यमातून सर्वजण पैसे काढत असतात. परंतु एटीएममधून पैसे काढल्यानंतर आपल्या खात्यातून पैसे गायब होत असतात. अशा घटना आपण अनेकवेळा ऐकत असतो. छोट्या -छोट्या चुकांमुळे आपली फसवणूक होत असते. त्यामुळे काही गोष्टी जर काळजी घेतली होणाऱ्या फसवणुकीपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. एटीएममधून पैसे काढताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपले अकाऊंट सेफ राहील. त्याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.
सामान्य ग्राहकांची बँकेमधील ठेवलेले पैसे सुरक्षित राहण्यासाठी आरबीआयकडून महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत. वेळोवेळी बँक एटीएम संबंधित नियम बदलत असतात.दरम्यान एटीएममधून पैसे काढताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती घेऊ. आपण जेव्हा आपण एटीएममध्ये जातो तेव्हा एटीएम मशीनचा स्लॉट व्यवस्थित चेक करून घ्यावा जर स्लॉट सैल असेल किंवा काही गडबड वाटत असेल तर अशावेळी अशा मशीनचा वापर पैसे काढण्यासाठी करू नये. जेव्हा आपण कार्ड स्लॉटमध्ये टाकतो तिथे दोन प्रकारचे लाईट चमकतात हिरवा आणि एक लाल. कार्डस स्लॉटमध्ये टाकल्यानंतर जर हिरवा लाईट समजला तर समजावे तुमचा एटीएम सुरक्षित आहे. परंतु जर लाल लाईट चमकत असेल किंवा कुठलाही लाईट चमकत नसेल तर अशा एटीएमचा वापर करणे टाळावे.
हॅकर्स कुठल्याही प्रकारचा डेटा एटीएम मशीनमध्ये कार्ड इन करण्याच्या स्लॉटमधून चोरतात. त्या स्लॉटमध्ये हॅकर्स एखाद्या डिवाइस लावून आपल्या कार्डमधील संपूर्ण माहिती स्कॅन करून चोरू शकतात. नंतर ब्लूटूथ किंवा अन्य वायरलेस डिव्हाईसचा माध्यमातून तुमचा डेटा चोरी करतात. त्यामुळे आपले बँक खाते रिकामी होऊ शकते.
जर आपली फसवणूक झाल्याचे वाटले तर बँकेत संपर्क साधावा किंवा पोलिसांचे संपर्क साधून फसवणुकीची माहिती करून द्यावी जेणेकरून आपल्याल हॅकर्सचे फिंगरप्रिंट मिळू शकतात. आपल्या कार्डचा फायदा मिळवण्यासाठी हॅकरकडे आपला पिन नंबर असणे आवश्यक असते. पण हॅकर्स कॅमेरा ट्रॅक करुन आपला पिन जाणून घेऊ शकतात. त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही जेव्हा आपण एटीएममध्ये जातो तेव्हा कार्ड वापरताना आपला पिन नंबर कोणाला दिसणार नाही अशाप्रकारे इंटर करावा किंवा दुसर्या हाताने पिन लपवून ठेवावा. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कॅमेरामध्ये पिन रेकॉर्ड होणार नाही. अशा प्रकारची काळजी घेतली तर आपण होणाऱ्या त्रासापासून आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतो.
Share your comments