कीटकनाशक फवारताना बाधित झालेल्यांची विशेष काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 17 August 2018 11:02 AM

पिकांवर कीटकनाशक फवारणीमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

आवाहनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरच्या पिकांच्या फवारणीचे काम शेतमजुरांना देताना, शेतमजुरांना सुरक्षाकवच (चष्मे, मास्क, हातमोजे, जॅकेट) उपलब्ध करुन द्यावेत. राज्यामध्ये शेतीपिकांवर कीटकनाशक फवारणी करताना बाधित शेतमजूर / शेतकरी रुग्णांवर उपचार करुन सुट्टी देताना त्यांना किमान 45 दिवस कीटकनाशकाच्या संपर्कात न येण्याच्या लेखी सूचना डॉक्टरांनी द्याव्यात, त्याची एक प्रत स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पाठवावी. तसेच, शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी बाधित शेतमजुरांना 45 दिवस फवारणीसाठी बोलावू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी त्यांचे शेतावर फवारणी करताना कोणासही विषबाधा झाल्यास अशा व्यक्तींना त्वरित नजीकच्या दवाखान्यात घेऊन जावे व सोबत वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांची बाटली / कंटेनरही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावी जेणेकरुन लवकर उपाययोजना करणे शक्य होईल, असे आवाहन कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी केले आहे.

Care taken ath the time Pesticide Sparying Agriculture Department Governmant of Maharashtara Vijaykumar Poisoning by Pesticide Spray
English Summary: Appealed by the Department of Agriculture to take special care of those affected by spraying pesticides

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.